Dhule News : सामोडेत सोयाबीन जाळले; शेतकरी हवालदिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burnt soybeans

Dhule News : सामोडेत सोयाबीन जाळले; शेतकरी हवालदिल

सामोडे (जि. धुळे) : सामोडेसह परिसरातील शेतकरी हवालदिल वीस ते पंचवीस क्विंटल सोयाबीनच्या गंजीला अज्ञातांनी आग लावली. (Twenty to twenty five quintals of soybean were set on fire by unknown persons farmers suffer huge loss dhule news)

शेतकरी प्रकाश रघुनाथ शिंदे यांचे सामोडे शिवारात पिंपळनेर जैबापूर रस्त्याला लागून गट नंबर १०१२/५ क्षेत्रातील तीन एकरचा सोयाबीन कापणी करून ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या गंजीला २६ जानेवारीला रात्री अज्ञात व्यक्तीने गंजीला आग लावून पेटवून दिला.

त्यात अंदाजे सुमारे पंचवीस ते तीस क्विंटल सोयाबीन जळून खाक झाल्याने या शेतकऱ्यांचे सव्वालाखाचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळी शेतात गेले असता तेव्हा सोयाबीनची पूर्णता पेटलेली दिसली.

श्री. शिंदे यांनी या घटनेसंदर्भात पिंपळनेर पोलिस ठाण्यात, तलाठी दिलीप चव्हाण यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सामोडेसह पिंपळनेर, चिकसे, देशशिरवाडे, शेनपुर, मलांजन गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

गेल्या आठवड्यात सामोडे येथील लक्ष्मण गंगाराम घाटे यांच्या शेडमधून ११ गोण्या सोयाबीन चोरट्यांनी लंपास केला. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांचे रोटर पलटी नांगर, तसेच मलांजन येथील शेतकऱ्याचे पलटी नांगर, रोटर रेझर बॅटरी, व जाळी बंडल असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

चिकसे येथील शेतकऱ्यांचे चाळीत गोण्या भरून ठेवलेला सोयाबीन चोरून नेला. सामोडेसह परिसरातील सर्व शेतकरी हवालदिल झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे. त्याचप्रमाणे रात्री गव्हाला व कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. वन विभागाने जाळी लावावी अशी मागणी होत आहे.