मायादेवीनगरातून मोबाईल लांबविणारे दोघे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

जळगाव - येथील मायादेवीनगरातील भाजी बाजारातील गर्दीत सपना कुणाल पांडे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दोन्ही भामट्यांना रामानंदनगर पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने अटक केली. अटकेतील दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रेसर सेग्मेंटची "एफ-झेड' दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. 

मायादेवीनगरात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या श्रीमती पांडे मंगळवारी (11 डिसेंबर) सायंकाळी मुलांना क्‍लासला सोडण्यासाठी गेल्या होत्या. नंतर चालत घरी परतताना पाटबंधारे कार्यालयाजवळ मागून काळ्या दुचाकीवरून आलेल्या दोनपैकी एकाने श्रीमती पांडेंच्या हातातील तेरा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला होता. श्रीमती पांडे यांचे पती कुणाल यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या डीबी पथकातील गोपाल चौधरी, किरण धनगर, विजय खैरे, विलास शिंदे, रूपेश ठाकरे यांच्या पथकाने शुभम ऊर्फ विक्की राजेंद्र चव्हाण (वय 21, रा. वाघनगर), शुभम ऊर्फ गणेश विजय बोराडे (वय 25, रा. मगरपार्क, वाघनगर) यांना दुपारी अटक करून त्यांच्याकडील स्पोर्टबाइक ताब्यात घेतली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, मोबाईल मात्र अद्याप काढून दिला नसून पोलिस कोठडीत दोघांकडून चोरीचा ऐवज जप्त करून शहरातील इतर गुन्ह्यांतही त्यांना वर्ग करण्यात येणार असल्याचे निरीक्षक बेंद्रेंनी माहिती देताना सांगितले. 

नवचैतन्य कोर्समधून गुन्हा उघड 
मंगळवारी (11 डिसेंबर) मायादेवीनगरात मोबाईलच्या जबरी लुटीचा गुन्हा घडला. यावेळी नवचैतन्य कोर्सला सहभागी कर्मचारी प्रदीप चौधरी यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील दोघे भामटे वाघनगरातील असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी माहिती पोलिस ठाण्याला कळवून दोघे संशयीत कोठे व कशा पद्धतीने भेटतील, याचीही माहिती दिल्यावर पथकाने दोघांना अटक केली.

Web Title: two arrested in jalgaon