मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघातात दोन जण ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार झाले. त्यात एका रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीसह दुचाकीस्वाराचा समावेश आहे. रामदास तुकाराम कर्डिले (रा. तडोबाची वाडी, जांभळी मळा, ता. शिरूर, पुणे) हे महामार्गावरील न्यू जमशेदपूर बॉंबे रोडवेजसमोर महामार्ग ओलांडत असताना भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली.

गंभीर जखमी झालेल्या रामदास यांना त्यांचे बंधू लक्ष्मण कर्डिले यांनी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना आडगाव शिवारात घडली. चेतन मधुकर पवार (वय 25, रा. पांढरूण, ता. मालेगाव) हे दुचाकी (एमएच 41 एआर 3004) वरून नाशिकहून मालेगावला जात होते. पुढे जात असलेल्या वाहनावर धडकून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

Web Title: two death mumbai agra highway accident