दोन शेतकऱ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

न्याहळोद - पाइप दुरुस्तीसाठी शेततळ्यात उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गाळात फसल्याने आज मृत्यू झाला. न्याहळोद येथील बिलाडी रस्त्यावर शेतकरी दौलत भिकन रोकडे यांच्या मालकीचे शेत आहे. या शेततळ्याजवळ परमेश्वर रोकडे (45), जगदीश ऊर्फ बबलू संतोष माळी (32) हे शेतात काम करत होते. शेततळ्यातून पाणी बाहेर येत नव्हते म्हणून पाइप दुरुस्त करण्यासाठी जगदीश हे तळ्यात उतरले. दुरुस्तीचे काम करून ते बाहेर येत होते. ते गाळात अडकल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी परमेश्वर याने हात दिला. त्याचाही तोल गेल्याने ते दोघे तळ्यात पडले. गाळात बुडून दोघांचा मृत्यू झाला.
Web Title: Two Farmer Death by Drown