रिधूरला दोन गटांत जोरदार हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

विहिरीवरून टॅंकरने पाणी नेल्यावरून वाद; दंगलीचा गुन्हा; ११ जणांना अटक

जळगाव - रिधूर (ता. जळगाव) येथे सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून टॅंकरद्वारे पाणी नेल्याच्या कारणातून वाद होऊन दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. ही घटना काल रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला असून, ११ संशयितांना अटक केली आहे.

विहिरीवरून टॅंकरने पाणी नेल्यावरून वाद; दंगलीचा गुन्हा; ११ जणांना अटक

जळगाव - रिधूर (ता. जळगाव) येथे सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून टॅंकरद्वारे पाणी नेल्याच्या कारणातून वाद होऊन दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. ही घटना काल रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला असून, ११ संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार रिधूर येथे शिवरस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी नामदेव ऊर्फ पिंटू शालिग्राम पाटील याने ठेकेदाराच्या टॅंकरद्वारे ग्रामपंचायतीच्या विहिरीतून रस्त्यांच्या कामांसाठी पाणी आणले.

त्याचा राग येऊन ग्रामपंचायत सदस्य पद्‌माकर भागवत पाटील, शिवदास कोळी (वय २२), केदार साहेबराव कोळी (वय २२), शुभम दिलीप सोनवणे (वय १९), सोनू तुषार कोळी (वय १९), शरद पुरुषोत्तम कोळी (वय २०), गंगाधर विठ्ठल पाटील (वय ४८), सागर अशोक कोळी (वय १९), विक्की नामदेव कोळी (वय २१), समाधान पुंडलिक सोनवणे (वय ३०), पुंडलिक तुकाराम कोळी (वय २४), प्रभाकर अभिमान पाटील (रा. सर्व रिधूर) यांनी नामदेव पाटील, शरद पुंडलिक पाटील व सुभाष दोधू पाटील यांना कुऱ्हाड तसेच लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. हे तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील तपास करीत आहेत.

पोलिसांनी रात्रीच अटकसत्र राबवून वरील सर्व ११ संशयितांना अटक केली. 

उपअधीक्षकांची घटनास्थळी धाव
मारहाणीच्या घटनेमुळे रिधूरला तणावाचे वातावरण असून दंगलसदृश स्थिती निर्माण झाली होती. या घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक आवारी, हवालदार उमेश भांडारकर, जितू पाटील, विजय दुसाने, धर्मेंद्र ठाकूर, प्रफुल्ल धांडे यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

संशयितांना चार दिवसांची कोठडी
या प्रकरणात अटकेतील अकरा संशयितांना न्यायाधीश एम. एम. चौधरी यांच्या न्यायालयात आज पोलिसांनी हजर केले. त्यांना चार दिवसांची (२ जानेवारीपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे.

विवाहितेचा विनयभंग
रिधूर येथे काल रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेदरम्यान मागील किरकोळ वादातून तिघांनी विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार सागर मुकेश कोळी, दीपक कोळी, विकास कोळी यांनी मागील वादातून विवाहितेच्या घरात प्रवेश करून विनयभंग केल्याची घटना घडली. दरम्यान पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून सागर कोळी, दीपक कोळी, विकास कोळी यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी तपास करीत आहेत.

Web Title: two group fighting