जळगाव कारागृह अधीक्षकासह कॉन्स्टेबलला लाच घेतांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डि. टी. डाबेराव आणि पोलिस शिपाई बापू आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना आज (शुक्रवार) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली.

जळगाव - जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डि. टी. डाबेराव आणि पोलिस शिपाई बापू आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना आज (शुक्रवार) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली.

एका कैद्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यासाठी परवानगीचा व्यवहार तीन हजार रुपयात ठरला होता. कैद्याला रुग्णालयात पाठवायचे होते. यासाठी त्याच्या नातेवाईकाला डाबेराव यांनी बंगल्यावर दोन हजार रुपये देण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार संबंधित नातेवाईकाने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती व त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून आज सकाळी आठ वाजता जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डाबेराव आणि त्यांचा कॉन्स्टेबल आमले यांना हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले व त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two officers arrested in bribe case