मखमलाबादत मध्यरात्रीला दुचाक्‍यांची जाळपोळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

नाशिक : मखमलाबाद गाव परिसरात असलेल्या रॉयल टाऊनमधील सिद्धीविनायक इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्रीच्या सुमारा अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत चार दुचाकी जळून खाक झाल्या. दीड महिन्यापूर्वीही अज्ञात समाजकंटकांनी या पार्किंगमधील दुचाकींचे नुकसान केल्याची तक्रार म्हसरुळ पोलिसात रहिवाशांनी दिली होती. परंतु पोलिसांच्या दूर्लक्षामुळे आज संशयितांनी दुचाकीं जाळून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मखमलाबाद गाव शिवारामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नव्याने इमारती उभ्या राहत आहेत. यातील रॉयल टाऊन परिसरामध्ये सिद्धीविनायक अपार्टमेंट ही तीन मजली इमारती आहे. या इमारतीच्या पार्किंगमध्ये शनिवारी-रविवारच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी चार गाड्‌यांना आग लावली. अचानक झालेल्या या घटनेमुळे रहिवाशी पार्किंगमध्ये धावले. तोपर्यंत गाड्‌यांनी पेट घेतला होता. रहिवाशांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. विजय भामरे यांची नवीकोरी प्लॅटिना दुचाकी (एमएच 15 एफके 9415), शारदा बुरकुल यांची प्लेझर, संतोष मोरे यांची एमए-10, पॅशन प्रो अशा चार गाड्या जळून खाक झाल्या होत्या. 

घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आज याप्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 3 जून रोजी मध्यरात्रीही अज्ञात संशयितांनी याच इमारतीच्या पार्किंगमधील वाहनांची तोडफोड केली होती. काही दुचाकींचे आरसे व सीट चोरीला गेले होते. त्यावेळीही म्हसरुळ पोलिसात तक्रार केली असता, पोलीसांनी तपासाचे आश्‍वासन दिले होते. परंतु सदरील तक्रारीची वेळीच दखल न घेतल्यान आज पुन्हा घटनेची पुनर्रावृत्ती झाली आणि यावेळी संशयितांनी मुजोरी वाढून गाड्यांच जाळून टाकल्या. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी म्हसरुळ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र तरीही पोलीस डिम्मच असून उलट त्यांनी रहिवाशांकडे आपला कोणावर संशय आहे का, अशी विचारणा केली, याचे रहिवाशांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

महिनाभरापूर्वीही कोणीतरी आमच्या पार्किंगमधील वाहनांचे नुकसान केले. त्यावेळीही आम्ही म्हसरूळ पोलीसात तक्रार केली. त्याचवेळी त्या तक्रारीची दखल घेतली असती तर आज आमच्या गाड्यांचे नुकसान झाले नसते. उलट पोलिसच आमच्याकडे संशयितांबद्दल विचारणा करताहेत. आम्हाला संशयित माहिती असते तर आम्ही नसते का त्यांना पकडले. मग पोलीसांचे काम काय? 

- विजय भामरे, रहिवाशी, सिदधीविनायक अपार्टमेंट

Web Title: Two-wheeler arson at midnight on Makhmalabad