"अल्ट्रा सायकलिंग'चा अनुभव सुखावणारा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

जळगाव - जगात काही मोजक्‍या आव्हानात्मक सायकलिंग स्पर्धा होतात. त्यापैकी 400 की.मी.ची बीआरएम ही अल्ट्रा सायकलींगच्या स्पर्धेतील अनुभव हा सुखावणारा राहिला. थंडीने अंग कुडकुडत असताना आणि गुडघ्यात दुखत असताना हे अंतर कापून दुसऱ्या क्रमांवर राहिलो हे अविस्मरणीय असल्याचा अनुभव डॉ. रवी हिराणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितला.

माधवराव गोळवलकर रक्‍तपेढीत झालेल्या पत्रपरिषदेत ऍड. आनंद परांजपे, किरण बच्छाव, स्वप्नील मराठे उपस्थित होते. डॉ. हिराणी यांनी अनुभव कथन करताना सांगितले, धावण्यासोबतच सायकलिंग करण्याची आवड निर्माण झाली. यात अल्ट्रा सायकलींग स्पर्धेत सहभागी होवून रॅन्डोनिअर होणारे जळगावातील ऍड. परांजपे यांचे मार्गदर्शन मिळाले. यातच धुळे सायकलिस्ट क्‍लबतर्फे आयोजित केलेली बीआरएम या स्पर्धेची जाहिरात आली. यातील 400 किमीच्या गटात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली. चारशे किमीचे अंतर कापण्याचा सराव म्हणून आठ दिवसांपुर्वी जळगाव ते अजिंठा ट्रिट पॉईट हे 140 किमी हे अंतर साडेआठ तासात पुर्ण केले.

24 तास 40 मिनिट
पर्यावरण जनजागृती या विषयावर आधारीत असलेल्या स्पर्धेला धुळे येथून सुरवात झाली. रविवारी (ता.18) सकाळी सहाला स्पर्धेला सुरवात झाली. धुळे- नाशिक आणि परत नाशिक- धुळे अशी 300 आणि धुळे ते शिरपूर व शिरपूर ते धुळे असे 100 म्हणजे एकत्र 400 किलोमीटर अंतराची सायकलिंग स्पर्धा 24 तास 40 मिनिटात पूर्ण करू शकलो नाही, तर त्यात दुसरा क्रमांकही मिळविला. जळगावातून एकटाच नाही, तर सोबत असलेले उद्योजक स्वप्नील मराठे यांनी देखील स्पर्धेत सहभागी होवून 26 तासात हे अंतर कापले. सायकलींग करत असताना 170 किमी अंतर कापल्यानंतर सायकल चालविण्यास वाटत नव्हते. परंतू, मनातील इच्छेने चालत राहिलो. थंडीत कुडकुडत असताना गुडघा दुखायला लागला, तरीही हरलो नाही आणि स्पर्धा पुर्ण करू शकलो याचा अधिक आनंद असल्याचे हिराणी यांनी सांगितले.

Web Title: ultra cycling experience