कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना एकरी एकवीस हजार रूपये आर्थिक मदत द्यावी

satana
satana

सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने जाचक अटी रद्द करून योजनांची व्याप्ती वाढवावी आणि शेतजमीन नावे असलेल्या खातेदाराला सरसकट एकरी एकवीस हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, अन्यथा कोणतीही पुर्वसुचना न देता तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज सोमवार (ता.११) रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला. 

बागलाण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण पाटील व अमोल बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार प्रमोद हिले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी दिलेल्या निवेदनात, बागलाण तालुका गेल्या आठ ते दहा वर्षांपासून दुष्काळी तालुका झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या कष्टाने वाचवलेला शेतीमाल शेतकर्‍याला नाइलाजाने बाजारात कवडीमोल दरात विकणे भाग पडत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकर्‍यांनी कंटाळून आत्महत्या देखील केल्या आहेत. यातच केंद्र शासनाने कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. कृषी सन्मान योजनेतील कुटुंब ही अट रद्द करून शासनाने शेतजमीन नावे असलेल्या खातेदाराला सरसकट एकरी एकवीस हजार रूपये आर्थिक मदत द्यावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत ३० जून २०१७ अखेर पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना कर्जमाफी देण्यात यावी, शेतीपंपांचे विजबिल माफ करण्यात यावे, दुष्काळी मदत देतांना कोरडवाहू बागायती असा भेदभाव न करता विनाविलंब एकरकमी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी, बागलाण तालुका गंभीर दुष्काळात असून शेतमजूरांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत बैलगोठा, शेळी गोठा कुक्कुटपालन शेड शिवारपांद्या आदी कामांना तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन शेतमजूरांच्या हाताला काम द्यावे, चारा छावण्या उभारण्याबरोबरच शेती शिवारात सिंगलफेज योजना राबवून भीषण दुष्काळाशी सामना करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. या मागण्यांची तत्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. 

यावेळी शहराध्यक्ष नितिन सोनवणे, शहर उपाध्यक्ष सनिर देवरे, प्रसिद्धी प्रमुख सचिन जाधव, टोनी मोरे, राजेंद्र सावकार, मयुर अहिरे, शशी कोर, किरण वाघ, तुषार मोरे, माणिक पवार, चेतन कोठावदे, सागर शेवाळे, गणेश पगारे, यशवंत पवार, मनिष शेलार, रोहित सावंत, विकास बागूल, ओंकार बागूल, धिरज सोनवणे, योगेश अहिरे, दिपक रौंदळ, वैभव खैरणार आदींसह ग्रामीण भागातील युवक व शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com