नागपुरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याला असा दिला निरोप...

nagpur
nagpur

नागपूर : पोलिस विभागाची तब्बल 34 वर्षे सेवा करणाऱ्या एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाला नोकरीच्या शेवटच्या दिवशी धंतोली पोलिसांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप दिला. संपूर्ण पोलिस स्टेशन आणि कार फुलांनी सजविण्यात आली. सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्याला खांद्यावर उचलून नवरदेवाच्या कारप्रमाणे साज-श्रृंगाराने सजविलेल्या कारमध्ये बसविण्यात आले. हा सोहळा पाहणाऱ्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याच्या कळा पाणवलेल्या होत्या.  

कुंदन लक्ष्मण वाघमारे असे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. धांतोली पोलिस ठाण्यात मुद्‌देमाल मोहरीर या पदावर कार्यरत असलेल्या वाघमारे यांचा शनिवारी नोकरीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच मनाला हूरहूर लागलेल्या वाघमारे हे नेहमीप्रमाणे ठाण्यात आले. ठाणेदाराला सॅल्यूट ठोकून कक्षात गेले. काही वेळाच काही पोलिस कर्मचारी पोलिस स्टेशनच्या भिंतीवर गुलाबाची फुले चिटकवित होते तर काहींनी फुलांच्या माळा बांधण्यास सुरूवात केली. वाघमारे यांना आश्‍चर्य वाटले. त्यांनी सहकाऱ्याला विचारले मात्र, कुणीही त्यांना काहीच सांगेना.

सायंकाळी सहा वाजता ठाणेदार दिनेश शेंडे हे स्वतः मुद्‌देमाल कक्षात गेले. त्यांनी वाघमारे यांना कडकडून मिठी मारली. त्यावेळी त्यांचा संपूर्ण स्टाफ मागे उभा होता.
नोकरीचा शेवटचा दिवस असल्याने आम्ही तुमच्या स्वागतासाठी ही तयारी केल्याचे सांगितले. वाघमारे यांच्या हृदयाचे ठोके वाढले. त्यांना हसावे कि रडावे? सूचत नव्हते. शेवटी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. असा अविस्मरणीय प्रसंग धंतोली ठाण्यात घडला. सर्व अधिकारी आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी वाघमारे यांना खांद्यावर उचलून घेतले. अगदी ठाण्यासमोर लावलेल्या कारमध्ये बसवले आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत पोलिस खात्याची सेवा केल्याबद्‌दल आम्ही आभारी आहोत, अशी भावना व्यक्‍त केली. 

पोलिस दलात नोकरी करीत असताना अनेक चढ-उतार बघितले. अनेकदा नोकरी सोडून देण्याचा विचारही मनात आला. पण अचूक वेळी पत्नीने मोलाची साथ दिली. त्यामुळे सलग 34 वर्षे खार्दी वर्दीला जागलो. आज वरिष्ठ आणि सहकाऱ्याचे प्रेम आणि आदर बघून अभिमाने ऊर भरून आला. 
- कुंदन वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक. 

आमच्या पोलिस कुटूंबातील सदस्य सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान-आदर करणे हे आमचे कर्तव्य आहे. या उपक्रमामुळे पोलिस कर्मचाऱ्यात नवचैतन्य येईल तसेच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना यथायोग्य सन्मान होईल. 
- दिनेश शेंडे, ठाणेदार, धंतोली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com