गाडी घसरल्याने विहिरीत बुडून आईसह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 31 जुलै 2018

तळेगाव दिघे (नगर) - गतीरोधकावरून दुचाकी (स्कुटी) स्लीप होत आई व चिमुकला विहिरीत फेकला गेल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. प्रियंका महेश देशमुख (२२) व सोहम महेश देशमुख (2) अशी मृत माय लेकराची नावे आहेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास जवळेकडलग (संगमनेर) येथे ही घटना घडली. 

विरगाव (ता. अकोले) येथून प्रियंका महेश देशमुख या दुचाकीवरून (स्कुटी) जवळेकडलग येथे घराकडे परतत असताना त्यांची दुचाकी स्लीप झाली आणि गतीरोधकावरून घसरली. दुचाकीवरील त्यांच्या सासू छाया दगडू देशमुख या रस्त्याच्या बाजूने फेकल्या गेल्या. तर स्कुटी चालविणारी प्रियंका महेश देशमुख व सोहम महेश देशमुख हे दोघेही रस्त्याच्याकडेच्या विहिरीत फेकले गेले. पाण्यात बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री नऊच्या सुमारास ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. 

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलिस ठाण्यातमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर माय लेकराच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The unfortunate death of the mother with the help of mother & child