डबक्यांमध्ये मासे पकडण्याचे अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

गावातून राज्य महामार्ग क्रमांक 47 जातो. एक किमी रस्त्याची पुर्णतः दूरावस्था झाली आहे. या एका किलोमीटरची कधीच डागडुजी होत नाही. त्यातच सांडपाणी व पाणी पुरवठा जलवाहिनीचे पाणीही रस्त्यावरच वाहत असल्याने अधिकच  दूरावस्था झाली आहे. गेल्या महिन्यापासून ठिकठिकाणी डबके साचतात. आज (ता.23)   ग्रामस्थांनी या डबक्यांमध्ये मासे पकडण्याचे आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीचा  निषेध केला.

कापडणे (धुळे) : गावातून राज्य महामार्ग क्रमांक 47 जातो. एक किमी रस्त्याची पुर्णतः दूरावस्था झाली आहे. या एका किलोमीटरची कधीच डागडुजी होत नाही. त्यातच सांडपाणी व पाणी पुरवठा जलवाहिनीचे पाणीही रस्त्यावरच वाहत असल्याने अधिकच  दूरावस्था झाली आहे. गेल्या महिन्यापासून ठिकठिकाणी डबके साचतात. आज (ता.23)   ग्रामस्थांनी या डबक्यांमध्ये मासे पकडण्याचे आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीचा  निषेध केला.

या आंदोलनात गोकुळ पाटील, गोपाल माळी, शरद माळी, हनुमंत पाटील, भानुदास पाटील, रोहीदास माळु, जगदीश पाटील, गणेश गुरव, भरत पाटील, लोटन माळी, किशोर भिल, ज्ञानेश्वर माळी दिनेश खलाणे, दादू गोसावी, भूषण पाटील, भैय्या माळी, गोटू पाटील, समाधान बोरसे, सतीलाल सोनवणे आदी सहभागी झालेत.

गेल्या आठवड्यात राज्य महामार्ग क्रमांक 47 ची देवभाने फाट्यापासून दुरुस्ती झाली. मात्र गावातील एक कि.मी.चा रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही. तर ज्याची दुरुस्ती झाली. तो भाग केवळ आठच दिवसांनंतर खड्डेमय झाला आहे. तकलादू दुरुस्ती झाल्याबद्दलही ग्रामस्थांनी आज संताप व्यक्त केला.

सरपंच म्हणतात ते आमचे काम नाही !
गावातूनच जाणारा रस्त्याची दुरुस्ती व दोन्ही बाजूंनी गटारी करण्यास ग्रामपंचायत समर्थ आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभाग परवानगी देत नाही. ते रस्त्याचे रुंदीकरण करुन काँक्रीट रस्ता बनवणार आहेत. त्यामुळे ते भिजत घोंगडे पडले आहे. जलवाहिनीतून वाहणारे पाणी बंद करण्यासाठी ठोस उपाय योजना करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. ग्रामस्थांनीही सहकार्य करायला हवे.- भटू पाटील, सरपंच कापडणे

Web Title: Unique movement to catch fish in Poteholes