Unseasonal Rain : मालपूर परिसरात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांची तारांबळ

unseasonal rain damaged rabi crop doindaicha dhule news
unseasonal rain damaged rabi crop doindaicha dhule newsesakal

दोंडाईचा : मालपूर (ता. शिंदखेडा) भागात सोमवारी (ता. १३) सायंकाळी आठच्या सुमारास अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. (unseasonal rain damaged rabi crop doindaicha dhule news)

सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. तयार झालेले गहू, हरभरा, मका पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. आठवडाभरात तिसऱ्यांदा रब्बी पिकांना फटका बसला आहे.

त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळपासून विजांचा लखलखाट सुरू झाला. सायंकाळच्या सुमारास जवळपास वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

unseasonal rain damaged rabi crop doindaicha dhule news
Nashik News : वडील रागावल्याने चिमुकल्यांनी घर सोडले! सतर्क चेहडी ग्रामस्थांनी केले पालकांच्या स्वाधीन

त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा काढणीस आला आहे. जास्त कमी पाऊस झाला तर कांदा पिकालाही धोका असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

unseasonal rain damaged rabi crop doindaicha dhule news
Dhule ITI : धुळे आयटीआयला 'या' तारखेला भरती मेळावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com