Unseasonal Rain : अवकाळीने धुळे तालुक्यात नुकसान; भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Damage crop due to unseasonal rains
Damage crop due to unseasonal rains esakal

सोनगीर (जि. धुळे) : धुळे तालुक्यात बुधवारी (ता. १५) रात्री व गुरुवारी (ता. १६) सकाळी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, आधीच उत्पादित मालाला भाव नसल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अधिकच नुकसान सोसावे लागणार आहे. (unseasonal rain Panchnama and compensation has been demanded due to loss of gram wheat dhule news)

शेतकऱ्यांच्या तयार हरभरा व गव्हाचे नुकसान झाल्याने पंचनामा व भरपाईची मागणी केली आहे. तालुक्यात रात्रभर ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटाने भीतीचे वातावरण होते. पहाटेपासून पावसाला सुरवात झाली.

त्यामुळे सोनगीरसह दापुरा, दापुरी भागात किरकोळ नुकसान झाले, तर न्याहळोदला पिके जमीनदोस्त झाली. मका, ज्वारी, बाजरी, गहू व हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिलीप भोगे, देवीदास जिरे, शशिकांत रोकडे, आशाबाई विसपुते (सर्व न्याहळोद) आदींचे अधिकच नुकसान झाल्याने त्यांनी पंचनाम्याची व भरपाईची मागणी केली.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Damage crop due to unseasonal rains
Nashik Employees Strike : एल्गार ‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा; कर्मचारी- शिक्षकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

कुसुंबा परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परिसरात गहू, हरभरा, कांदा पावसात भिजला, तर काही शेतकऱ्यांनी आपला माल झाकून ठेवल्याने सुरक्षित राहिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अजून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजी व सतर्कता दिसत आहे. नगाव परिसरातही शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कापडणे, धनूर परिसरात गडगडाट असला तरी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. तीच स्थिती नेर, शिरूड व धामणगाव परिसरात होती. सोनगीर येथील सोमेश्वर महादेव मंदिराजवळ वीज कोसळल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे मंदिराजवळील सर्व बल्ब उडाले. मात्र नुकसान झाले नाही.

Damage crop due to unseasonal rains
Unseasonal Rain: अवकाळी, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान; कांद्याला प्रादुर्भावाची शक्यता, पीक झाकण्यासाठी धावपळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com