शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशातील 52 विद्यार्थ्यांचे "अपग्रेडेशन' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यंदा पहिले वर्ष असून, यात शंभर जणांना प्रवेश द्यावयाचे आहेत. यात आज जाहीर झालेल्या दुसऱ्या फेरीतून 60 जणांचे प्रवेश निश्‍चित झाले असून, महाविद्यालयात एकूण 99 प्रवेश निश्‍चित झाले आहेत. उरलेल्या एका जागेबाबत मात्र स्पष्ट झालेले नाही. 

जळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यंदा पहिले वर्ष असून, यात शंभर जणांना प्रवेश द्यावयाचे आहेत. यात आज जाहीर झालेल्या दुसऱ्या फेरीतून 60 जणांचे प्रवेश निश्‍चित झाले असून, महाविद्यालयात एकूण 99 प्रवेश निश्‍चित झाले आहेत. उरलेल्या एका जागेबाबत मात्र स्पष्ट झालेले नाही. 

जळगाव जिल्हा रुग्णालयात यावर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुरवात झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे यंदा पहिले वर्ष असून, प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. महाविद्यालयात राज्य शासनाच्या कोट्यातून 85 आणि केंद्र शासनाच्या कोट्यातून 15 असे एकूण शंभर प्रवेश द्यावयाचे आहेत. प्रवेशासाठी पहिल्या राऊंडमध्ये 91 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले होते; यापैकी 12 जणांनी प्रवेश घेतले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी 18 ऑगस्ट ही अंतिम तारीख असून, सर्व विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत प्रवेश निश्‍चित करावयाचे आहेत. 

दुसऱ्या राऊंडला 60 जणांची निवड 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी आज दुसऱ्या राऊंडमधील यादी जाहीर करण्यात आली. यात 60 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिवाय, पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चित झालेल्या 91 विद्यार्थ्यांमधील 52 मुलांचे अपग्रेडेशन झाले असून, त्यांना मुंबई, धुळे, अकोला, औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालये मिळाली आहेत. म्हणजेच पहिल्या फेरीतील 91 पैकी 39 विद्यार्थी हे जळगाव येथील महाविद्यालयासाठी असून, आजच्या फेरीतील 60 विद्यार्थी असे 99 विद्यार्थ्यांचे जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश निश्‍चित झाला आहे. 

Web Title: Upgradation of 52 students in government medical college admissions