Dhule News : उपमहापौरपदी वैशाली वराडे निश्‍चित; बिनविरोध निवड

Vaishali Varade confirmed as deputy mayor of dhule news
Vaishali Varade confirmed as deputy mayor of dhule newsesakal

Dhule News : शहराच्या उपमहापौरपदासाठी अर्ज सादर करण्याच्या शनिवारी (ता.३) शेवटच्या दिवशी महापालिकेतील सत्ताधारी भाजपतर्फे एकमेव प्रभाग क्रमांक-१० (क) च्या उमेदवार वैशाली भिकन वराडे यांचा अर्ज दाखल झाला.

त्यामुळे उपमहापौरपदी त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली. दरम्यान, ७ जूनला विशेष सभेत त्यांच्या निवडीवर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होईल.(Vaishali Varade confirmed as deputy mayor of dhule news)

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नागसेन बोरसे यांनी आपल्या उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले, त्यामुळे नवीन उपमहापौरपद निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली. उपमहापौरपदासाठी अर्ज विक्री, स्वीकृतीच्या प्रक्रियेत शुक्रवारी (ता.२) जूनला एकही अर्ज दाखल झाला नाही.

शनिवारी (ता.३) शेवटच्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास सत्ताधारी भाजपकडून प्रभाग क्रमांक-१० (क) च्या नगरसेविका वैशाली वराडे यांनी अर्ज दाखल केला.

श्रीमती वराडे यांच्या बिनविरोध निवडीनंतर महापालिकेत शतप्रतिशत महिलाराज आणल्याचे श्री. अग्रवाल म्हणाले, दरम्यान, ओडिशातील रेल्वे दुर्घटनेमुळे या निवडीबद्दल आज जल्लोष करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vaishali Varade confirmed as deputy mayor of dhule news
Dhule Crime News : पत्नीच निघाली पतीची मारेकरी; पोलिसांनी उकलले खुनाचे रहस्य

श्रीमती वराडे यांनी तीन अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जांवर नगरसेवक प्रदीप कर्पे, शीतल नवले, हर्षकुमार रेलन सूचक तर चंद्रकांत सोनार, अमोल मासुळे, नागसेन बोरसे अनुमोदक आहेत. अर्ज दाखलप्रसंगी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी,

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, नगरसेवक चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, शीतलकुमार नवले, नागसेन बोरसे, हिरामण गवळी, सुनील बैसाणे, अमोल मासुळे, राजेश पवार, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, राकेश कुलेवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, उपमहापौरपदासाठी श्रीमती वराडे यांचा अर्ज दाखल झाल्याने उपमहापौरपदी त्यांची निवड निश्‍चित झाली आहे. असे असले तरी ७ जूनला होणाऱ्या विशेष सभेत निवडीची अधिकृत प्रक्रिया होईल. त्यानंतरच त्यांच्या उपमहापौरपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.

Vaishali Varade confirmed as deputy mayor of dhule news
Dhule Job Fair : धुळ्यात या तारखेला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com