Dhule Crime News : वाइन शॉपच्या बोर्डची तोडफोड; दीडशे जणांवर गुन्हा दाखल

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमावाद्वारे घोषणाबाजी करीत विनोद वाइन शॉपच्या बोर्डाची तोडफोड करून नुकसान केले.
crime
crimeesakal

Dhule Crime News : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमावाद्वारे घोषणाबाजी करीत विनोद वाइन शॉपच्या बोर्डाची तोडफोड करून नुकसान केले.

तसेच विनापरवाना झेंडे, फलक लावून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (vandalism of wine shop board case registered against 150 people dhule crime news)

जावेद अलीम शेख यांच्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता.१८) दुपारी साडेबाराच्या सुमारास आनंद साहेबराव लोंढे, संतोष पंढरीनाथ अमृतसागर, रवींद्र विठ्ठल वाघ, दावल भटू वाघ, विजय शंकर सावकारे.

रत्नशील सोनवणे (सर्व रा. धुळे) हे जमावबंदी आदेश असताना शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांसह शहरातील साक्री रोडकडून विनोद वाइन शॉप येथे विनापरवानगी एकत्र आले, घोषणाबाजी केली.

त्याचवेळी त्यांना बंदोबस्तावरील पोलिसांनी मागणीबाबत समक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करा, असे सांगितले.

crime
Dhule Crime News : अक्कडसेतील वाळूमाफियांची दबंगगिरी; पोलिस ठाण्यातून वाळूचा ट्रॅक्टर पळविला

मात्र, तरीही आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती चौकात, बसस्थानक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वसामान्यांना वेठीस धरले.

तसेच आनंद लोंढे यांनी चिथावणी देऊन त्याच्यासह इतरांनी लाकडी दांडक्याने विनोद वाइन शॉपच्या डिजिटल बोर्डावर मारून तोडफोड केली.

आंदोलनाच्या अनुषंगाने संतोषी माता चौक ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत विनापरवानगी झेंडे व बॅनर लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचे म्हटले आहे. यावरून शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला.

crime
Dhule Crime News : लळिंग घाटात सिनेस्टाईल लूट; दुचाकीस्वारांकडून अडीच लाखांची रोकड लांबविली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com