crime
crimeesakal

Dhule Crime News : लळिंग घाटात सिनेस्टाईल लूट; दुचाकीस्वारांकडून अडीच लाखांची रोकड लांबविली

मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग (ता. धुळे) घाटात गुरुवारी (ता.१८) रात्री सिनेस्टाईल लूटमारीची घटना घडली.

Dhule Crime News : मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग (ता. धुळे) घाटात गुरुवारी (ता.१८) रात्री सिनेस्टाईल लूटमारीची घटना घडली. दोन दुचाकीवरील चौघांनी एका दुचाकीवरून रोकड नेणाऱ्या तिघांचा पाठलाग केला.

बचावासाठी दुचाकी वेगाने पळविताना तिघांचा अपघात झाला. ही संधी साधून लुटारूंनी त्यांच्याकडील अडीच लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (bike rider thief stole Cash of two and half lakh at Laling Ghat dhule crime news)

धुळे शहरातील अनस अक्तर हुसेन खान (रा. प्लॉट नंबर-५, लोहा बाजार, साबीरनगर) हा तरुण १७ जानेवारीला शमशाद अस्लम मलीक व दिलनवाज नूर मोहम्मद खान या दोघांसह दुचाकी (एमएच-१८ बीएस ०१४१) ने मालेगाव येथील व्यापाऱ्यांना दिलनवाज मोहम्मद खान याच्या दुकानातून दिलेल्या मालाच्या उधारीचे पैसे घेऊन परतत होते.

रात्री अकराच्या सुमारास लळिंग घाटात पोलिस चौकीजवळील टीव्ही टॉवरनजीक पाठीमागून दोन दुचाकींवर चारजण आले.

त्यातील एका दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने धावत्या दुचाकीवर चाकूचा धाक दाखवत दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न करून पाठीवर असलेली पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला.

crime
Dhule Bribe News : PSI, हवालदार ‘ACB’च्या जाळ्यात; 5 हजार लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

मात्र, अनस खान याने लुटारूंचा इरादा लक्षात घेऊन दुचाकी आणखी वेगाने पळविली. त्यात तोल जाऊन दुचाकीसह तिघे पडल्याने जखमी झाले.

त्यादरम्यान पाठलाग करणारे दोन्ही दुचाकीस्वार पुढे जात थांबले. त्यातील एकाने अनस खान याच्याजवळ येत जमिनीवर पडलेली दोन लाख ४५ हजार ३०० रुपयांची रोकड असलेली स्कूल बॅग उचलून नंतर चौघे मालेगावच्या दिशेने पसार झाले.

दरम्यान, तिघा जखमींना मित्रांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत अनस खान याने मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

crime
Dhule Crime News : अक्कडसेतील वाळूमाफियांची दबंगगिरी; पोलिस ठाण्यातून वाळूचा ट्रॅक्टर पळविला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com