Jagdeep Dhankhar | भूमीचे क्षरण रोखणे आवश्यक : उपराष्ट्रपती धनखड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

While meeting Vice President Jagdeep Dhankhad and giving a special address, Dr. Gajanan Dange, Dr. Gunakar

Jagdeep Dhankhar | भूमीचे क्षरण रोखणे आवश्यक : उपराष्ट्रपती धनखड

नंदुरबार : नवी दिल्ली येथे अक्षय कृषी परिवार (संस्थेच्या) प्रतिनिधी मंडळाने नुकतीच उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

गेल्या काही वर्षांत भारतात होत असलेल्या भूमी क्षरण विषयात माहिती दिली. (Vice President Jagdeep Dhankhar statement about Land erosion nandurbar news)

त्यात वैज्ञानिक आणि शेतकरी यांनी हे स्वीकार केले आहे, की भूमीची धारणाक्षमता कमी झाली आहे. देशाच्या हिताच्या दृष्टीने हे थांबविणे आवश्यक आहे.

त्यांना गेल्या काही वर्षांतील भूमी सुपोषण आणि संरक्षण यांच्या दृष्टीने केल्या गेलेल्या सामूहिक आणि वैयक्तिक, विशेषतः छोट्या आणि सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

प्रतिनिधी मंडळाने भूमीची वर्तमान स्थिती आणि भूमीला सुपोषित करण्याच्या आधुनिक तसेच परंपरागत पद्धतींची महिती देणारा एक संकलित विशेषांक भेट दिला. उपराष्ट्रपती धनखड यांनी प्रतिनिधी मंडळास या विषयात मार्गदर्शन केले आणि भूमी सुपोषण ही एक अनिवार्य राष्ट्रीय गतिविधी असल्याचे सांगितले.

त्यांनी या कार्याला सर्व वर्गांच्या सहयोगातून अधिक तीव्र करण्याचा सल्ला दिला. प्रतिनिधी मंडळात मुख्यतः भूमी सुपोषण विशेषांकाचे संपादक शास्त्रज्ञ डॉ. गजानन डांगे आणि अक्षय कृषी परिवाराचे सचिव डॉ. गुणाकर उपस्थित होते.