Nandurbar Crime News : पीडित तरुणीचा मृतदेह तब्बल 40 दिवसांनंतर बाहेर; अक्कलकुवा तालुक्यातील घटना

A crowd gathers at the burial site.
A crowd gathers at the burial site. esakal

Nandurbar Crime News : मोलगीचा चनवाईपाडा (ता. अक्कलकुवा) येथील पीडित तरुणीचा मिठात पुरलेला मृतदेह तब्बल ४० दिवसांनंतर न्यायालयाच्या आदेशाने बाहेर काढण्यात आला. मृतदेह पुन्हा विच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आल्याची कार्यवाही मंगळवारी (ता. २२) दिवसभर सुरू होती.

मोलगीचा चणवाईपाडा येथील मृत पीडित मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. तिने फाशी घेतल्याचा बनाव केला गेला होता. (victim body was taken out after 40 days by court order nandurbar crime news)

या प्रकरणी पोलिसांनी केवळ पीडित तरुणीला त्रास देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा संबंधितांविरुद्ध नोंदविला होता. यासंदर्भात पीडित तरुणीच्या पालकांची तक्रार मोलगी पोलिसांनी ऐकून न घेतल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

१३ जुलै २०२३ ला येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या विच्छेदनाबाबतही संशय व्यक्त करीत पीडित तरुणीचा मृतदेह घरासमोर मिठात पुरून न्यायासाठी पालकांनी न्यायालयात दाद मागितली होती.

शहादा येथील अतिरिक्त जिल्हा, तसेच सत्र न्यायाधीश सी. ए. दातीर यांनी २१ ऑगस्टला पीडित तरुणीचा पुरलेला मृतदेह काढून त्याचे पुन्हा मुंबई येथील जे. जे. रुग्णालयातील विशेष वैद्यकीय पथकामार्फत विच्छेदन करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A crowd gathers at the burial site.
Crime : रिल्सवर गुन्हेगारीचे समर्थन तरुणाला पडले चांगलेच महागात; पोलिसांनी घेतले ताब्यात

त्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी दहाला घटनास्थळी अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर सोपस्कार पार पाडत दुपारी बाराला मृतदेह काढण्यासाठी खोदकाम सुरू झाले.

तीनच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून तहसीलदार रामजी राठोड यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुन्हा प्लास्टिक पिशवीच्या आवरणात सीलबंद करून सायंकाळी सहाच्या सुमारास शववाहिनीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, सहाय्यक निरीक्षक राजेश गावित यांच्यासह वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. या कार्यवाहीदरम्यान पथकाव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही.

A crowd gathers at the burial site.
Nashik Crime: टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या; चिठ्ठीत तिघांचा उल्लेख, गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com