पालघरच्या वनगांमुळे नाशिकला युतीत ‘वणवा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नाशिक - पालघर येथील दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाने इच्छा दर्शविल्यास शिवसेनेची उमेदवारी देण्याच्या शिवसेना पक्षप्रमुखांची घोषणा भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी (ता. ७) नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्या मागे बळ उभे करण्याच्या हालचाली गतिमान केल्या. वनगांमुळे नाशिकला युतीत चांगलाच वणवा पेटल्याचे चित्र होते.

अर्ज माघारीच्या दिवशी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्‍वर गायकवाड व देवळा विकास आघाडीचे अशोक आहेर यांनी अर्ज मागे घेतले. अपक्ष परवेज कोकणी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात भाजप उमेदवार म्हणूनच उल्लेख आहे. मात्र, भाजपने त्यांना ‘ए’ व ‘बी’ फॉर्म दिला नाही, पण भाजपचे त्र्यंबकेश्‍वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व भाजप नगरसेवकांनी सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सोमवारी पुन्हा फोनाफोनी होऊन भाजपने कोकणी यांना तयारीला लावले.

युतीत मतभेद, आघाडी एकत्र
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या रणनीतीबाबत सोमवारी मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप पक्षाकडून कुठलाही निर्णय आलेला नसल्याचे त्रोटक उत्तर दिले. पक्षाचा आम्हाला काहीही आदेश नाही, असेच स्थानिक पातळीवर नेते सांगत असले, तरी भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी कोकणी यांच्यामागे ताकद उभी करत दबाव वाढविला आहे. काँग्रेस आघाडीत मात्र पक्षीय धोरणानुसार सोमवारी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गायकवाड यांनी माघार घेतली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दूरध्वनी आला. त्यांच्या सूचनेनुसार काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी युती असल्याने माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Vidhan Parishad election Yuti Shivsena BJP Politics