Vidhansabha 2019 : प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठका सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरू केली असून, उद्या (ता. २५) नवी मुंबई येथे कोकण विभागाची पहिली आढावा बैठक होईल. दुसरी उत्तर महाराष्ट्राची जिल्हानिहाय बैठक शुक्रवारी (ता. २६) नाशिकमधील तूपसाखरे लॉन्समध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित होईल.

नाशिक - आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरू केली असून, उद्या (ता. २५) नवी मुंबई येथे कोकण विभागाची पहिली आढावा बैठक होईल. दुसरी उत्तर महाराष्ट्राची जिल्हानिहाय बैठक शुक्रवारी (ता. २६) नाशिकमधील तूपसाखरे लॉन्समध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित होईल. राज्यातील ९५० जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. तसेच जिल्हास्तरावर २९ ते ३१ जुलैला इच्छुकांच्या मुलाखती हाेतील.

नाशिकमधील बैठकीसाठी अनुसूचित जाती सेलचे कार्याध्यक्ष जितेंद्र देहाडे शहरात दाखल झाले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार वामसी चाँद रेड्डी, कार्याध्यक्ष नितीन राऊत, विश्‍वजित कदम, मुजफ्फर हुसेन हे उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 State Congress Meeting Start Politics