नांदगाव: विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, असे निर्देश भटक्या-विमुक्त जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी (ता. ३०) दिले.