विनय फडणीसांना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नाशिक - गुंतवणूकदारांची साठ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विनय फडणीस यांना आता ठाणे येथे झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तपासकामी ताब्यात घेण्यासाठी ठाण्याचे पथक येथे आले. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपल्याने फडणीस यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

फडणीस ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे मुंबई, नाशिक आणि ठाण्यातील तीनशेवर गुंतवणूकदारांची साठ कोटी रुपयांवर फवसणूक झाल्या प्रकरणी येथील गंगापूर पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांच्या अटकेनंतर तपासासाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या वेळी गुंतवणूकदारांनी न्यायालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Web Title: vinay fadnis custody