चला आपण सारे मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावू या! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

सकाळतर्फे हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय उपयुक्‍त आहे. भारताचे भवितव्य हे तरूण पिढीवरच अवलंबून आहे. त्यामुळे वयाचे अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरीकाने मतदानाचा हक्‍क बजवायला हवा. 
- प्राचार्य डॉ. एस. बी. बागल, सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय. 

नाशिक - आपला उचित प्रतिनिधी निवडणे हे आपल्याच हाती आहे. त्यामुळे शहर विकासासाठी घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा आपण वापर केला पाहिजे, निर्भयपणे मतदान करण्यास प्राधान्य द्यायलाच हवे, अशी हमी सपकाळ नॉलेज हबच्या विद्यार्थ्यांनी दिली. 

"सकाळ', महापालिका आणि भाविन व्हिल्स प्रा. लि. यांच्यातर्फे "व्होटयात्रा' उपक्रम राबविला जात आहे. त्यांतर्गत आज कल्याणी चॅरीटेबल ट्रस्टच्या सपकाळ नॉलेज हब प्रांगणात कार्यक्रम झाला. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. आम्हीही मतदानाचा हक्‍क बजावणार असल्याचे सांगत इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करू, अशी ग्वाही तरूणाईने दिली. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. 

सकाळतर्फे हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय उपयुक्‍त आहे. भारताचे भवितव्य हे तरूण पिढीवरच अवलंबून आहे. त्यामुळे वयाचे अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरीकाने मतदानाचा हक्‍क बजवायला हवा. 
- प्राचार्य डॉ. एस. बी. बागल, सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय. 

भारताच्या राज्यघटनेत आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. जेव्हा मतदार हे विकासासाठी मतदान करतील तेव्हाच भारत महासत्ता होऊ शकेल. चांगल्या लोकांच्या हातात सत्ता असणे खुप महत्वाचे ठरते. 
-प्रा.डॉ. सुहास धांडे, संचालक, एमबीए महाविद्यालय. 

निवडणुक जवळ आल्यावर राजकीय पुढाऱ्यांना तरूणांची आठवण येते. केवळ झेंडे उचलण्यापेक्षा तरूणांनी योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तरच भारत विकसीत देश होऊ शकेल. 
- तेजस पाटील 
"यिन'च्या शॅडो कॅबिनेटचा अर्थमंत्री. 

आपले एक मत एखाद्या चांगल्या उमेदवाराच्या निवडीसाठी महत्वाचे ठरू शकते. म्हणून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्‍क प्रत्येक युवकाने बजवायला हवा. 
-प्राची जगताप. 

रस्ते खराब असल्यावर आपण बोंब मारतो. पण लोकप्रतिनिधीला जाब विचारत नाहीत. आता योग्य वेळ आली आहे, आपल्याला बोंब मारावी लागणार नाही, अशाच उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी प्रत्येकाने मतदान करावे. 
-ऋषिकेश पाटील. 

Web Title: voting rights campaign in nashik