वाघूर धरण शंभर टक्के भरल्याने जळगावचा दोन वर्षांचा पाणीप्रश्‍न सुटला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गिरणा धरण १०० टक्के भरले. त्यापाठोपाठ आता वाघूर धरणही शंभर टक्के भरल्याने भुसावळ, जामनेर तालुक्‍यांतील पाणीटंचाई मिटण्यास मदत होणार आहे. हे धरण पाचव्यांदा शंभर टक्के भरले आहे. वाघूर धरण जळगाववासीयांसाठी महत्त्वाचे आहे. यामुळे जळगावचा पाणीप्रश्‍न आता दोन वर्षांसाठी मिटला आहे.

जळगाव - पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गिरणा धरण १०० टक्के भरले. त्यापाठोपाठ आता वाघूर धरणही शंभर टक्के भरल्याने भुसावळ, जामनेर तालुक्‍यांतील पाणीटंचाई मिटण्यास मदत होणार आहे. हे धरण पाचव्यांदा शंभर टक्के भरले आहे. वाघूर धरण जळगाववासीयांसाठी महत्त्वाचे आहे. यामुळे जळगावचा पाणीप्रश्‍न आता दोन वर्षांसाठी मिटला आहे.

गेल्या उन्हाळ्यात जळगावकरांना चार ते सहा दिवसांआड पाणी मिळत होते. अनेक ठिकाणी पाणीटंचाई होती. यंदाचा उन्हाळा जळगावकरांसाठी पाण्याबाबत खडतर गेला. आगामी उन्हाळ्यात मात्र जळगावकरांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. वाघूर धरणात दोन वर्ष पुरेल एवढे पाणी त्यात आहे.

जिल्ह्यात आजअखेर पर्यंत १११.६ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची एकूण सरासरी ६६३.२ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ७४०.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे पावसाची टक्केवारी १२५ टक्‍क्‍यांपर्यंत पोचण्याची चिन्हे आहेत.

‘वाघूर’चे चार दरवाजे उघडले
हतनूर धरणात ५९.६१ टक्के पाणीसाठा आहे. या धरणाचे ८ दरवाजे पूर्ण उघडले आहेत. गिरणा धरण शंभर टक्के भरले आहे. आता वाघूर धरणही शंभर टक्के भरल्याने जामनेर परिसरातील पाण्याचा प्रश्‍न मिटल्यात जमा आहे. वाघूर धरणाचे चार दरवाजे साडेपाच मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे वाघूर नदीही आता दुथडी भरून वाहू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waghur Dam Water Full Jalgaon Water Issue Solve