कचरा निर्मूलनासाठी "डीपीआर' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

धुळे - शहरातील कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत नियुक्त केलेल्या खासगी सल्लागार संस्थेच्या प्रतिनिधींनी आज शहरात पाहणी केली. "कचरा निर्मिती ते विल्हेवाट' अशा संपूर्ण प्रक्रियेची सद्यःस्थितीची प्राथमिक स्वरूपात माहिती घेतली. कचरा व्यवस्थापनाच्यादृष्टीने पुढील 25 वर्षाची गरज लक्षात घेऊन संबंधित संस्था "डीपीआर' (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करून तो शासनाला सादर करणार आहे. 

स्वच्छ व सुंदर शहरांसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनातर्फे मदत होणार आहे. त्यासाठी त्या-त्या शहरांतील कचरा निर्मिती ते कचऱ्याची विल्हेवाट याबाबत सद्यःस्थिती, अडचणी आणि भविष्याची गरज काय याबाबत सर्वेक्षण करण्याचे काम केंद्र शासनाने खासगी सल्लागार संस्थांकडे सोपविले आहे. नाशिक विभागातील दहा शहरांचे काम "इको प्रो एन्वारमेंटल सर्व्हिस' सल्लागार संस्थेकडे सोपविले आहे. 

विविध ठिकाणी पाहणी 
नियुक्त "इको प्रो एन्वारमेंटल सर्व्हिस' या संस्थेचे प्रतिनिधी निघत गनी, श्रद्धा तोमर आणि अभिजित जैन यांनी आज धुळ्यात विविध कॉटन मार्केट, जिल्हा रुग्णालय, संभाजी गार्डन, कचरा डेपो, पेठ भाग तसेच काही हॉटेल्सला भेटी देत तेथील कचरा व्यवस्थापनाबाबत माहिती घेतली. तत्पूर्वी सकाळी त्यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांच्याशी चर्चा केली. संस्थेचे हे प्रतिनिधी उद्या (ता.23) शिरपूरला भेट देणार असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

"डीपीआर' तयार करणार 
सद्यःस्थितीत शहरात किती कचरा निर्माण होतो, कर्मचारी किती, वाहने किती, कचराकुंड्या किती, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, कचरा डेपोची स्थिती काय याची माहिती घेऊन संबंधित संस्था पुढील 25 वर्षात घनकचरा व्यवस्थपानाचासाठी शहराची गरज काय याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तो शासनाला सादर करणार आहे.

Web Title: Waste eradicate DPR