पाण्यासाठी शेतकऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

येवला - बोकटे येथील भैरवनाथ महाराज यात्रेसाठी आरक्षित पाणी पालखेड डावा कालव्याला सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणी द्यावे अशी मागणी अंदरसुल, बोकटे परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर धोरण्याच्या निषेधार्थ तिरडीवर एका शेतकऱ्याला झोपवून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.चार तास होऊनही प्रशासन दाद देत नसल्याने शिवसेनेचे माजी तालुकप्रमुखाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.यामुळे वातावरण अधिक गंभीर झाले होते.

दोन वर्षांपासून आरक्षित असूनही बोकटे येथील यात्रेसाठी पिण्याचे पाणी देण्याला ठेंगा दाखवला आहे.त्यामुळे आता आवर्तनातून पाणी सोडावे ही मागणी शेतकरी करत आहेत. याबाबत दोन आठवड्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार ,पाटबंधारे विभागाला निवेदन देऊनही दखल घेण्यात आली नाही.यामुळे निषेधार्थ आज शेतकऱ्यांनी तहसील कार्यलयावर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.

शेतकऱ्यांचा रोष इतका होता की लाकडाची चिता रचत संदीप देशमुखहे तिरडीवर झोपले होते.

Web Title: Water Farmer Symbolic endowment