गिरणा धरणातून  आवर्तन सुटले 

दीपक कच्छवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

मेहुणबारे(ता. चाळीसगाव) : जळगाव  जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडील पत्रानुसार गिरणा धरणातून आज सकाळी सहालाच आवर्तन सोडण्यात आले आहे. गिरणाकाठच्या गावांसह भडगाव, पाचोरा, या गावांमध्ये पाणी टंचाई दुर होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पाचोरा,भडगाव चाळीसगाव ग्रामीण भागातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.सद्य:स्थितीत पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत.नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, आज जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशानुसार आज सकाळी सहाला धरणातून 2  हजार 500 क्यूसेक एवढे आवर्तन सोडण्यात आले असल्याची माहिती गिरणाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी ' सकाळ'ला दिली. सोडण्यात आलेले हे आवर्तन पिण्यासाठीच असल्याने त्याचा शेतीसाठी वापर करू नये, आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल,असे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी सांगितले.गिरणातून आवर्तन सुटणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या पाण्यामुळे गिरणा काठाच्या गावांना दिलासा मिळणार आहे.गिरणा धरणात एकूण साठा 9 हजार 714 दशलक्ष घनफुट असुन 36 . 29 टक्के धरणात पाणी साठा शिल्लक असल्याची माहीती पाटबंधारे विभागाने दिली.

Web Title: water has been released from the Girna dam