गिरणातून पिण्यासाठी आवर्तन सुटले

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 4 एप्रिल 2018

दरम्यान, पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार काल(ता. 3, मंगळवार) दुपारी एकला धरणातून 1 हजार 500 क्यूसेक एवढे आवर्तन सोडण्यात आले.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये गिरणा धरणातून काल(ता.3, मंगळवार) दुपारी एकला आवर्तन सोडण्यात आले. यामुळे गिरणाकाठच्या शहरांसह गावांमध्ये पाणी टंचाई मिटण्यास मदत होणार आहे. 

जिल्ह्यातील पाचोरा शहरासह अन्य गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे. 

दरम्यान, पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार काल(ता. 3, मंगळवार) दुपारी एकला धरणातून 1 हजार 500 क्यूसेक एवढे आवर्तन सोडण्यात आले. अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. या आवर्तनामुळे पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. तसेच हे आवर्तन फक्त पिण्यासाठीच असल्याने त्याचा इतर कुठल्याच कामांसाठी उपयोग करू नये, तसे आढळल्यास पाटबंधारे विभागाकडून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: water release in Girna Dam