प्रगतिपथावरील पाणी योजना प्रत्यक्षात मात्र रखडलेल्याच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

नाशिक - जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत सुरू असलेल्या अनेक पाणीपुरवठा योजना कागदावर प्रगतिपथावर दिसत आहेत. प्रत्यक्षात त्या योजनांची कामे बंद असल्यामुळे ग्रामीण भागात लोकांना पाणी मिळत नाही. यामुळे सर्व योजनांची सविस्तर माहिती दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी आज पाणीपुरवठा विभागाला दिले. 

जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी आज ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची बैठक बोलाविली होती. त्यात पाणीपुरवठा योजनांची सद्यःस्थिती, अपूर्ण योजना, पूर्ण योजना यांची माहिती अध्यक्षा शीतल सांगळे यांनी घेतली. या वेळी अनेक योजना कागदावर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात अनेक कारणांमुळे त्या रखडलेल्या आहेत. काही योजनांचे काम तर सुरूही झाले नाही. काही ठिकाणी हागणदारीमुक्त गावाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने निधीचा पुढचा हप्ता थांबला. त्यामुळे या योजनांचे काम बंद पडलेले आहे. 

बैठकीस ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांच्यासह विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

यू-डायस भरण्याचे आदेश 
जिल्हा परिषद अध्यक्षा सांगळे यांनी शिक्षण विभागाचाही आढावा घेतला. या वेळी शिक्षण सभापती यतिंद्र पाटील उपस्थित होते. अनेक शाळांचे मुख्याध्यापक यू-डायसमध्ये शाळा खोल्यांची दुरुस्ती दाखविल्यास वर्गसंख्या कमी होऊन शिक्षकांची संख्या कमी होईल, या भीतीने ती माहितीच नोंदवत नसल्याचे निदर्शनास आल्याचे अध्यक्षा सांगळे यांनी सांगितले. वास्तवात अनेक शाळा नादुरुस्त आहेत, पडक्‍या झाल्या आहेत, तर काही शाळा धोकादायक बनलेल्या आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी यू-डायस भरताना ही माहिती भरावी, असे आदेश अध्यक्षा सांगळे यांनी शिक्षण विभागाला दिले. 

Web Title: water scheme issue