जलरक्षकांचा असहकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नाशिक - गावोगावच्या जलरक्षकांच्या मानधनाचा तिढा सुटत नसल्याने त्यांनी घेतलेल्या असहकाराच्या भूमिकेमुळे उत्तर महाराष्ट्रातील चार हजार 331 विहिरींच्या नोंदींचे काम ठप्प आहे. पारंपरिक मोघम नोंदीवरच उत्तर महाराष्ट्रात भूजल सर्व्हेक्षणाचे गावनिहाय आराखडे तयार होण्याचा धोका आहे.

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत अद्यावत गावनिहाय भूजल आराखडे केले जाणार आहे. यात नागपूरच्या महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरला 5 हजार 58 विहिरींच्या अचूक नोंदीची अद्यावत भूजल माहिती पाठवून आराखडे केले जाणार आहेत. आतापर्यंत वर्षानुवर्षांपासून 717 निरीक्षण विहिरींच्या नोंदीवरच उत्तर महाराष्ट्राचे भूजल सर्व्हेक्षण व्हायचे. यंदा त्यात, नवीन आणखी 4,341 विहिरींचा समावेश करत, आधिक अचूकता आणून विभागाचे आणि त्यानंतर गाव आराखड्याचे काम सुरू आहे. पण ज्या गावोगावच्या जलरक्षकांच्या भरवशावर हे काम होणार आहे. तेच मानधनासाठी अडून बसल्याने उत्तर महाराष्ट्राचे भूजल सर्व्हेक्षणाच मोघम असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: water security Non-cooperation Honorarium