नाशिक जिल्ह्यातील तहानलेल्या गावे-वस्त्यांची संख्या हजारांकडे

water
water

येवला - जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे व वाडया-वस्त्यांची संख्या वाढत्या उन्हाबरोबरच दिवसागणिक वाढत असून आजच तहानलेल्या गावे-वस्त्यांनी सातशेचा आकडा पार केल्याने ही संख्या हजाराच्या दिशेने आगेकूच करत आहे. आजच १६९ गावे व ५४० वाड्यांना (एकूण ७०९)१८० टँकरने रोज ५०३ खेपा पाणीपुरवठा होत आहे.माणशी २० लिटर याप्रमाणे तब्बल ४ लाख नागरिक आजच टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. जिल्ह्यासाठी ही बाब नक्कीच भूषणावह नसून नाही अजून टंचाईचे दोन महिने जाणार असल्याने जिल्ह्यातील स्थितीचा उद्रेक होणार हे नक्की..

यंदा पावसाने अवकृपा केल्याने भयावह स्थिती उद्भवली असून जिल्ह्यात आठ तालुके व 17 महसूल मंडळे देखील दुष्काळ जाहीर केले आहेत.पावसाने भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ जिल्ह्यात आणली होती. यात डिसेंबरपासून अधिकच भर पडत आहे. आता तर मार्च सुरू असला तरी तो मे महिन्यातील तीव्रतेची बरोबरी करत असल्याने दिवसागणिक जेथे-जेथे पाणी आहे ते झपाट्याने आटत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या वाढत असून अनेक गावात तर टँकर पोहोचला नाही तर पिण्यासाठी पाणी देखील मिळत नसल्याचे चित्र जिल्हाभरात आहे.

आजच तब्बल 709 गावे वाड्यांना 503 टँकर दिवसाला पाणी पुरवठा सुरू आहे. म्हणजेच दिवसाला तब्बल 4 लाख  नागरिकांसाठी मानसी 20 लिटर याप्रमाणे 85 ते 90 लाख लिटर पाणीपुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत टँकर भरण्यासाठी पाणी मिळविण्याची पंचायत झाल्याचे येव्ल्यासह अनेक ठिकाणी चित्र आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरू असला तरी येणार्याम काळात टँकर कुठून भरणार हा ही प्रश्न निर्माण होऊ शकतो. आज मितीस दिवसाला शासनाचे लाखो रुपये निव्वळ टँकरने पाणीपुरवठासाठी खपत आहे. त्यातही अनेक गावातून लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या प्रमाणात पाणी मिळत असल्याच्या तक्रारी होऊन टॅंकरच्या खेपा वाढविण्याची मागणी सुरू आहे.चालू महिन्यातच टँकरग्रस्त गावे आणि गाड्यांची संख्या हजारापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

७ तालुके तहानलेले तर ८ तालुके पाणीदार!
सद्यस्थितीत टंचाईच्या झळा सर्वाधिक सिन्नर तालुक्याला बसत असून येथे एकूण टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या तब्बल 243 आहे, यासाठी 111 खेपा रोज सुरू आहेत. त्याखालोखाल नांदगाव येथे 196 गावे वाड्यांना 95 टँकर तर मालेगाव येथे 105 गावे वाड्यांना शंभर टँकरणे रोज पाणीपुरवठा सुरू आहे. बागलाण व येवल्याची स्थितीही चिंताजनक असून येथेही दिवसाला 80 टँकर खेपा सुरू आहेत. हे सात तालुके तहानलेले आहेत तर बागायतदारांचे तालुका असलेले दिंडोरी, निफाड, नाशिक, इगतपुरी, कळवण, पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या आठ तालुक्यात मात्र अद्याप पुरसे पाणी असल्याने टॅंकरची गरज भासली नसल्याचेही चित्र आहे.

टँकरचे आकडे बोलतात...
तालुका   -  गावे   - वाड्या   - टँकर  - फेऱ्या
बागलाण -  ३५    -   ४    -   २८     -   ८३
देवळा  -     ९       - १६    -   ८      -   १५
चांदवड   -   ९     -   १०    -   ६      -  २०
मालेगाव -   २५    -  ८०   -  ३२     -  १००
नांदगाव -    २२    - १७४   -  ३१     -  ९५
सिन्नर  -     १९    - २२४   - ४४    -  १११
येवला   -     ५०     - ३२    -  ३१    -    ७९
एकूण    -     १६९  -  ५४०  -  १८०   -  ५०३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com