चाळीसगाव: अखेर राजमानेत प्रशासनाला आली जाग 

दीपक कच्छवा
रविवार, 15 एप्रिल 2018

राजमाने येथील हातपंपाला चांगले पाणी लागले आहे.चौदाव्या वित्त आयोगातुन या हातपंपावर वीजपंप बसवण्यात येणार आहे.तसेच गावातील तीन खाजगी बोअरवेल धारकांच्या बोरला चांगले पाणी आहे.त्याना देखील ग्रामस्थांना पाणी भरू द्यावे आश्या सुचना दिल्या आहेत. 
- आर.सी.पाटील, साहाय्यक अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चाळीसगाव

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : राजमाने (ता. चाळीसगाव) येथील पाणी प्रश्नासंदर्भात गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाला 'सकाळ'च्या वृत्तानंतर जाग आली खरी; मात्र बंद असलेल्या हातपंपांपैकी एकच हातपंप दुरुस्त करण्यात यश आले. त्यामुळे अजूनही या गावातील पाणीप्रश्न कायम असल्याने ठोस उपाययोजना करण्याची गरज  आहे.

राजमाने (ता.चाळीसगाव) येथील गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.या संदर्भात सकाळ ने राजमानेत भीषण पाणीटंचाई हातपंप ठरले शोपीस या मथळ्याखाली वृत्त 12 रोजी गुरुवारी मुख्य अंकातील पान दोनवर वृत्त प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली होती.या वृताची दखल घेत तालुका प्रशासनाने येथील गावात आज  दुपारी हातपंप दुरूस्त करण्यासाठी कर्मचारी दाखल झाले होते.येथे असलेल्या चार हातपंपांपैकी केवळ दोनच हात पंप दुरूस्त केले. यातील देखील एक हातपंपाचा पाईप कोरडा असल्याने त्याला पाणी लागले नाही.एकमेव सकाळ ने येथील गावाचा पाणी प्रश्नासह हातपंपाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले होते. या ठिकाणी महिलांना पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे.आज दुरूस्त करण्यात आलेला हातपंपाचे पाणी भरतांना महीलांसह ग्रामस्थांमध्ये आनंद झाला होता.

विहिरीची पहाणी 
राजमाणे गावाला पाणीपुरवठा करणारी योजना गिरणा वरून आहे.त्या योजणेचे पाणी तेथील  ग्रामस्थांना मिळत नाही.त्यामुळे त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दै.सकाळ च्या वृत्ताची दखल घेत  तहसिलदार कैलास देवरे यांनी ग्रामसेवक व तलाठी यांना तेथे  विहीरीची पहाणी करण्यासाठी पाठवले होते.गावाजळ दोन  विहीरीची पहाणी केली. एक विहीर रेल्वे लाईन ओलांडुन आहे.व एक दुसरी गावाजवळ असलेल्या एका विहिरीचा प्रस्ताव बनविण्यास सांगितला असल्याची माहिती तहसीलदार कैलास देवरे यांनी सकाळ शी बोलतांना दिली. ग्रामस्थांच्या म्हणणे आहे की आम्हाला आमचे हाक्काचे गिरणा चे पाणी द्यावे. 

हातपंप ठरणार संजीवनी 
राजमाने येथील पाणीटंचाई संदर्भात सकाळ ने प्रसिद्ध केल्या वृत्ताची दखल घेऊन आज दुपारी पाणीपुरवठा अभियंता आर. सी. पाटील यांनी पहाणी केली. येथे  दुरूस्त करण्यात आलेल्या  हातपंपाला चांगले पाणी लागले आहे. येथील महीलांचे पाण्यासाठी खुप हाल होत आहेत. त्यामुळे येथील हातपंपावर आता  वीजपंप बसवून त्यांचे पाणी मिळणार असल्याने हा हातपंप दलित वस्तीतील रहिवाशांना संजीवनी ठरणार आहे.

सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रीया
'सकाळ'च्या हातपंपाची बातमी संदर्भात खुपच जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर पाणी प्रश्न चांगलाच पेटला. सकाळने प्रकाशित केलेली बातमी ट्विटर  चांगलीच व्हायरल झाली. ट्विटरवर राजमानेतील पाणी टंचाईवर प्रशासनाप्रती खुपच संतप्त प्रतिक्रीया  उमटत आहे.यात व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रीयेत राजमाने पाठोपाठ कळमडु गावात देखील पाण्याची टंचाई आहे.त्यामुळे गिरणाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विजबिलामुळे आता राजमाने पाठोपाठ करमुडकरांना देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया ट्विटर वर उमटत आहे.

सकाळचे आभार 
राजमाने गावातील पिण्याच्या पाण्याच्या  प्रश्नाला दै.सकाळ समूहाने वाचा फोडून गावातील हातपंपाचा विषय मार्गी लावला. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्या साठी होणारे हाल व त्यांच्या मनातील व्यथा सकाळ ने ठळकपणे मांडल्याने कळमडू (ता. चाळीसगाव) येथील विकास मंचच्या सदस्यांनी  दैनिक सकाळ चे आभार मानले आहेत.

राजमाने येथील हातपंपाला चांगले पाणी लागले आहे.चौदाव्या वित्त आयोगातुन या हातपंपावर वीजपंप बसवण्यात येणार आहे.तसेच गावातील तीन खाजगी बोअरवेल धारकांच्या बोरला चांगले पाणी आहे.त्याना देखील ग्रामस्थांना पाणी भरू द्यावे आश्या सुचना दिल्या आहेत. 
- आर.सी.पाटील, साहाय्यक अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चाळीसगाव

Web Title: water supply rajmane in chalisgaon