कळमडुसह राजमानेचा पाणीपुरवठा पूर्ववत

दीपक कच्छवा
रविवार, 20 मे 2018

'सकाळ' केवळ  वृत्तपत्र नसुन आमचे कुटुंब आहे.आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच आम्ही पाठपुरावा करून कळमडु व राजमाने गावांच्याचा पाणीपुरवठा योजनेच्या  विज बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी ठरलो. मात्र हे खरे श्रेय फक्त 'सकाळ' चे आहे.
- कवीता पाटील, सरपंच, कळमडु

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कळमडु व राजमाने (ता. चाळीसगाव) गावात पाणीटंचाई असता पाणीपुरवठा योजनेचे जिल्हा परिषदेने विजबिल भरले नाही. त्यामुळे महिलांना दुरवर पायपीट करून पाणी आणावे लागत होते. या संदर्भात 'सकाळ' ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गिरणेची पाणीपुरवठा योजना अखेर सुरू झाली असुन ग्रामस्थांना पाणी मिळु लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी 'सकाळ' ला धन्यवाद दिले आहेत.
    
कळमडु व राजमाने या दोन्ही गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली होती.यात राजमाने येथील महीलांचे पाण्यासाठी खुप हाल होत होते.त्या संदर्भात 'सकाळ' ने 'विजेने पळविले राजमानेचे तोंडचे पाणी' या मथळ्याखाली रविवारी ( 8 एप्रिल) जिल्हा पानावर वृत्त  प्रसिद्ध केले.त्यानंतर गावातील पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिला संदर्भात माहिती घेतली व प्रशासनाला पाणीप्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडले.

कळमडु गोमपंचायतीने  जिल्हा परिषदेची 80  टक्के पाणीपट्टी रक्कम भरलेली होती.जिल्हा परिषदेने वीजवितरण कंपनीला पैसे न भरल्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे विज पुरवठा खंडित  केला होता.ज्यामुळे  कळमडु, आभोणा, आभोणा तांडा, राजमाने, व  राजमाने तांडा या गावातील लोकांना पाणी मिळणे बंद झाले होते. 'सकाळ' ने ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ग्रामस्थांना हक्काचे गिरणेचे पाणी मिळुन दिल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदने भरले बिल
चाळीसगाव तालुक्यात केवळ कळमडु येथे जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. कळमडुच्या सरपंच कविता पाटील यांनी 'सकाळ' च्या वृत्तानंतर जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला.ऐशी टक्के पाणीपट्टी भरून त्याव्यतीरीक्त 2 लाख 75  हजाराचा वीजबिलाचा भरणा केला.16मेस  जिल्हा परिषदेने कळमडु पाणीपुरवठा योजनेचे 4 लाख 70 हजार 93 रूपये बिल भरले.  त्यानंतर गिरणा नदीवरून  पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला. गावातील पिण्याच्या पाण्याच्या  प्रश्नाला 'सकाळ' ने वाचा फोडली. हातपंपाचा व विजबिलाचा प्रश्न मार्गी लावला. ग्रामस्थांना पाणी मिळाल्याने  संगणकीय अभियंता गुणवंत सोनवणे व कळमडु विकास मंचच्या सदस्यांनी  'सकाळ' चे आभार मानले.

'सकाळ' केवळ  वृत्तपत्र नसुन आमचे कुटुंब आहे.आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच आम्ही पाठपुरावा करून कळमडु व राजमाने गावांच्याचा पाणीपुरवठा योजनेच्या  विज बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी ठरलो. मात्र हे खरे श्रेय फक्त 'सकाळ' चे आहे.
- कवीता पाटील, सरपंच, कळमडु

कळमडुतील चित्र
लोकसंख्या.......... 7940
पाण्याच्या विहीरी........ 8
जलकुंभ ......................7
नळ जोडणीधारक ....860

Web Title: water supply in Rajmane Chalisgaon