वाढत्या तापमानामुळे पूर्व विभागातून टॅंकरची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

जुने नाशिक - वाढत्या तापमानामुळे शहरात पाणीटंचाई भासू लागली आहे. पूर्व विभागात विशेषतः वडाळा, अशोका मार्ग या भागात पाण्याची जास्त टंचाई भासते. टॅंकरच्या माध्यमातून येथील रहिवाशांची तहान भागवली जात आहे. दुसरीकडे, नळपट्टी स्वरूपातील बिलांची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांकडून बिलांच्या वसुली व भरणा न केल्यास त्यांची नळजोडणी बंद करण्यावर भर दिला जात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहरातील उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. गंगापूर धरणातील पातळी खालावत आहे. पूर्व प्रभागातील बऱ्याच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. वडाळा, इंदिरानगर भागात अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत. शनिवारी (ता. 25) रात्री अकराच्या सुमारास अपुरा पाणीपुरवठा झाल्याने येथील महिलांनी नगरसेवकांच्या घरावर मोर्चा नेत आपली कैफियत मांडली. गेल्या अनेक दिवसांपासून पूर्व विभागाच्या अनेक भागांत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे या भागातून पाण्याच्या टॅंकरची मागणी दुप्पट वाढली आहे. प्रभाग 30 मध्ये सर्वाधिक टंचाई भासत आहे. दैनंदिन 8 ते 10 टॅंकरने याठिकाणी पाणीपुरवठा केला जातोय. 

टॅंकरची संख्या अपुरी 
सध्या जीपीओ जलकुंभावर 1200 व पाच हजार लिटर असे दोनच टॅंकर आहेत. त्यात कर्मचाऱ्यांची जेवणाची सुटी यामुळे नागरिकांना वेळेत पाण्याचा टॅंकर उपलब्ध होत नाही. नागरिक व कर्मचारी यांच्यात वाद होत असल्याने टॅंकरची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 

पाणीटंचाईची ठिकाणे 
वडाळा गाव, इंदिरानगर, अशोका मार्ग, डीजीपीनगर क्रमांक 1, जुने नाशिक भागातील नानावली, कथडा या भागात सर्वाधिक टॅंकरची मागणी होत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. 

Web Title: water tanker demand

टॅग्स