धान्याच्या राशींतून वंचितांच्या मुखी घास

नरेंद्र जोशी
सोमवार, 21 जानेवारी 2019

नाशिक - समाजातील विविध वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांच्या शिध्याची (धान्य) तहहयात जबाबदारी नाशिकच्या महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली असून, ‘वुई टुगेदर’ या संस्थेच्या माध्यमातून त्या धान्य बॅंकेचा उपक्रम राबवीत आहेत. वंचित संस्थाच्या मदतीसाठी वर्षभर हे धान्य वापरले जाते. 

मागील महिन्यात डॉ. कीर्ती हातवळणे, दुर्गा पुराणिक, अदिती गोखले, प्रतिभा कुलकर्णी, गौरी ओक, मनीषा विंचूरकर यांनी ‘वुई टुगेदर’ची स्थापना केली. आज ५० महिला या संस्थेच्या सभासद आहेत. वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांना तहहयात शिधा (धान्य) पुरविण्याची जबाबदारी या गटाने उचलली आहे. 

या गटाने शांतिवन व श्रद्धा फाउंडेशन या संस्था दत्तक घेतल्या आहेत. शांतिवन ही ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करते. पालक कामानिमित्त भटकत असले, तरी ही मुले एकाच ठिकाणी राहावीत, त्यांना दोन वेळचे जेवण, चांगले शिक्षण घेता यावे हा त्यामागचा हेतू आहे. 

स्मृती हरवलेल्या आणि भ्रमिष्ट होऊन कोठेही भटकत राहणाऱ्या वृद्धांसाठी काम करणाऱ्या श्रद्धा फाउंडेशनलाही मदतीचा हात दिला आहे. वैद्यकीय उपचार आणि दोन वेळच्या राहण्या-जेवण्याची मोफत सोय ही संस्था करते. 

...अशी आहे ‘धान्य बॅंक’!
दरमहा ५० रुपये अथवा वर्षाचे सहाशे रुपये भरून किंवा दरमहा एक किलो धान्य देऊन महिलांना या धान्य बॅंकेचे सक्रिय सभासद करून घेतले जाते. आपल्या संस्कृतीमधील गृहिणी अनेक गुणांनी समृद्ध आहेत. या गृहिणींकडे असलेल्या सामर्थ्याची त्यांना ओळख करून देत, सामाजिक कामांशी त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची आज समाजाला आवश्‍यकता आहे. गृहिणींना पाठिंबा देत, त्यांची हिंमत व हुरूप वाढविण्यासाठी हा गट प्रयत्नशील आहे.

धान्य बॅंकेला महिलांनी कमीत कमी एक किलो धान्य द्यायचे. धान्य द्यायचे नसेल तर धान्यासाठी किमान ५० रुपये महिना द्यायचे, अथवा वर्षाचे सहाशे रुपये जमा करायचे. यातून चांगले काम करणाऱ्या संस्थांना मदतीचा हात देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- डॉ. कीर्ती हातवळणे, वुई टुगेदर संस्था

Web Title: We Together organisation Grain Bank