Wedding Season : तुलसीविवाह झाला, आता लग्नसोहळ्यांचा धूमधुडाका

wedding News
wedding Newsesakal
Updated on

Wedding Season : दिवाळीचे आनंदपर्व संपताच आता अकरा दिवसांनी तुलसीविवाह झाला. तुलसीविवाहाची आतुरतेने वाट पाहणारे नववधू व वरपित्यांची आता आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचा बार उडविण्यासाठी लगभग सुरू झाली आहे. यंदा लग्नसराईच्या तारखा भरपूर असल्याने लग्नांचा धूमधडाका जोरदार राहण्याची शक्यता आहे. (wedding season start nandurbar news)

मात्र काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीचाही परिणाम लग्नसोहळ्यांवर जाणवण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.दिवाळीनंतर तुलसीविवाहापर्यंत देव बसलेले असतात असे म्हटले जाते. त्यामुळे लग्नसोहळ्यांना स्थगिती असते. तुलसीविवाहानंतर मात्र लग्नांचा धूमधडाका सुरू होतो. शुक्रवारीच तुलशीविवाह आटोपला.

त्यामुळे तुलसीविवाहाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नववधू-वर पालकांची लगबग सुरू झाली आहे. काहींचे लग्न जुळले आहे. त्यांची आपसात लग्नाची तारीख जुळविण्याचे काम सुरू केले आहे. काही नवीन लग्न जुळविण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

ज्यांची लग्ने जुळली आहेत ते लग्नाच्या तयारीत व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. मंगल कार्यालय, घोडा, आचारी, पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारीसह त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करताना दिसत आहेत.

त्यामुळे पुरोहितांनाही बुकिंग मिळत आहेत. आचाऱ्यांसह मंगल कार्यालयमालकांनी वेगवेगळी पॅकेजेस जाहीर केली आहेत. वधू-वरपिता आपापल्या ऐपतीनुसार पॅकेजची निवड करताना दिसत आहेत. मंगल कार्यालयांकडे बुकिंग झपाट्याने वाढत आहे.

wedding News
Wedding Season : दिवाळीनंतर लग्नाचा वाजेल बॅण्ड; विवाहासाठी यंदा 66 मुहूर्त

बघा मग..चांगलं स्थळ असेल तर सांगा..!

ज्यांच्या घरात मुलगा किंवा मुलगी लग्नाची आहे ते पालक नातेवाइकांकडे असलेल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. सोबत खिशात तयार केलेला बायोडाटा रेडी असतोच. गप्पा-टप्पांमधून आपापल्या मुलगा-मुलगीसाठीचे स्थळ सुचविण्यासाठी सूचक चर्चा करतानाच खिशातील बायोडाटा काढत ‘बघा मग.. चांगलं स्थळ असेल तर सुचवा हं..!’ असे म्हणत नातेवाइकांकडे जबाबदारी सोपवीत मदतीची अपेक्षा करताना दिसत आहेत.

समाजासमाजात वधू-वर परिचय ग्रुप

सध्या सोशल मीडियाचा वापर लग्न जुळविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी यांचा बायोडाटा व फोटो व्हॉट्सॲपवर तयार झालेल्या समाजाच्या ग्रुपवर प्रसिद्ध करीत अपेक्षित स्थळांची चाचपणी केली जात आहे. त्यावर एकमेकांना पसंत पडलेली स्थळे संपर्क क्रमांकावर संपर्क साधत लग्न जुळविण्यासाठीची मागणीबाबत चर्चा केली जात आहे.

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर वधू-वरांचा बायोडाटा व फोटो मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावर आवश्‍यक बाबी योग्य वाटल्या तर संपर्क करीत थेट एकमेकांच्या घरी येण्याचे निमंत्रण देत विवाह जुळविण्याचे काम होत आहे. त्यामुळे सोशल मीडिया आता लग्नासाठीचेही प्रभावी माध्यम ठरले आहे.

मुलांपेक्षा मुली उच्चशिक्षित

सध्या सोशल मीडियावरून फिरत असलेल्या विविध समाजांतील ग्रुपवरील बायोडाटावरील माहिती पाहता मुलांपेक्षा मुली उच्चशिक्षित असल्याचे दिसून येत आहे. मुलींमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बी. फॉर्मसी, वैद्यकीय शिक्षण, प्राध्यापिका अशी स्थळे सर्वाधिक दिसून येतात. त्यात वय फॅक्टर येतो. उच्चशिक्षित मुलीसाठी त्या योग्यतेचा मुलगा अपेक्षित असल्याने पालक संशोधन करताना दिसतात.

wedding News
Wedding Season : लग्नाचा ‘धूमधडाका’ 27 पासून; यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त

त्यामुळे वय वाढताना दिसून येते. तर, मुलांना उच्चशिक्षित असला तरी तो ॲडजेस्ट करून लग्न जुळविण्याच्या मूडमध्ये असतो. कारण मुलींचे प्रमाण कमी दिसते. एखादा गरीब कुटुंबातील पालकही आपल्या मुलीसाठी नोकरी असलेला वर शोधतो. शेतकरी पालकही मुलीला शेतकरी मुलगा नाकारतो. यामुळे कमी शिक्षित व शेतकरी किंवा साध्या व्यावसायिक मुलांना मुली मिळणे जिकिरीचे होऊ लागले आहे. ही समाजातील मोठी समस्या बनली आहे.

wedding News
Wedding Season Shopping: लग्नसराईच्या खरेदीने बाजारात लगबग! घागरा-चोलीला विशेष मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com