Vidhan Sabha 2019 : पश्चिम मतदारसंघात विलास शिंदे ओपनिंग आणि शेवट करणार; समर्थकाचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नाशिक पश्चिम मतदार संघात शिवसेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विलास आण्णा शिंदे हे ओपनिंग आणि शेवट करणार असा दावा समर्थकानी केला असला तरी सत्ताधारी आमदार व आघाडीचे तसेच मनसे, माकपचे मोठे आव्हान आहे.

सातपूर : नाशिक पश्चिम मतदार संघात शिवसेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विलास आण्णा शिंदे हे ओपनिंग आणि शेवट करणार असा दावा समर्थकानी केला असला तरी सत्ताधारी आमदार व आघाडीचे तसेच मनसे, माकपचे मोठे आव्हान आहे.

दरम्यान पच्छिम विधानसभेत शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक असताना सुद्धा हा मतदार संघ भाजपला सोडल्याने शिवसेचे सातपूर सिडकोतुन विलास शिदे, सुधाकर बडगूजर, मामा ठाकरे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले होते. माघारीच्या अंतीम दिवशी बडगूजर व ठाकरे यांनी पक्ष आदेश मानत माघार घेतली. पण शिंदे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदार संघात निवडणूकीची रंगत आणखीनच वाढली आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आसुन शिंदे हे स्थानिक तर आहेच पण त्यांच्या मिश्कील स्वभावामुळे ते सर्वाचे लाडकेही आहेत. आज अंतिम दिवशी माघारी न घेतल्यामुळे समर्थकाचा हुरूप वाढला असला तरी विद्यमान आमदार सीमा हिरे, आघाडीचे डॉ.अपुर्व हिरे, मनसेचे दिलीप दातीर, माकपचे डि.एल.कराड यांचे मोठे आव्हान राहणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in western constituency Vilas Shinde will win ; Supporter's Claim