मराठा क्रांती मोर्चाद्वारे समाजाने एकत्र येऊन काय मिळवले? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नाशिक - मराठा क्रांती मोर्चाची दिशा भरकटली असून, एकत्र येऊन समाजाने काय मिळवले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या मोर्चामुळे मराठा समाजाची सामाजिक स्तरावर एकी झाली असली तरी राज्यात तोच मराठा समाज मात्र एकटा पडत चालला आहे. काही लोकांच्या चुकांमुळे तो टीकेचा धनी होत आहे. गावगाड्यात मोठा भाऊ, अशी भूमिका निभावताना मराठा समाज इतरांना आधार वाटायचा; पण आता ती जागा भीतीने घेतली आहे. याच भीतीमुळे त्याच्याविरोधात सर्व समाज एकत्र येत आहेत, अशा शब्दात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चाबाबत सडेतोड भूमिका मांडली. 

आज येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेल्या मेटे यांनी पत्रकार परिषदेत शिवसंग्रामची भूमिका मांडली. सुरवातीला अरबी समुद्रातील शिवस्मारक, नवीन पक्ष आदी बाबींची माहिती दिल्यानंतर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाबाबत आता धाडसाने बोलणे गरचेचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की इतिहासात असे मोर्चे निघाले नाहीत. समाजातील आबालवृद्ध या मोर्चांमध्ये सहभागी झाले. मात्र, या मोर्चांमुळे काय साध्य झाले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यभर निघालेला मराठा क्रांती मोर्चा सरकारने त्यांच्या पद्धतीने हाताळला. या मोर्चात नंतर काही लोक हेतू ठेवून सहभागी झाले व त्यांनी त्यांच्या पद्धतीने मोर्चा हाताळला; पण आता या मोर्चाची दिशा भरकटली आहे. मोर्चामुळे समाज एकत्र आला; पण आता पुढारी बेकीचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक स्तरावर समाज एक झाला; पण राजकीय स्तरावर एक होणे शक्‍य नाही. तोच मराठा समाज आता राज्यात एकटा पडत चालला आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांनी बसवलेली सामाजिक घडी विस्कळित होणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

लोक हेतू साध्य करण्यासाठी सहभागी 
मोर्चाला चुकीची दिशा कुणी दिली, याबाबत तुमचा रोख कुणाकडे आहे, असे विचारले असता ते म्हणाले, की लोकांना ते माहिती आहे. हे लोक आपापले हेतू साध्य करण्यासाठी या मोर्चात सहभागी झाल्याचाही आरोप त्यांनी केला. याबरोबरच अजूनही वेळ गेलेली नाही. काही भले करता आले नाही, तर किमान समाजाचे नुकसान तरी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: What the community got together by Maratha kranti morcha