मी बोललो तर देश हादरेल - एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

जळगाव - मी बोललो तर संपूर्ण भारत हादरून जाईल. त्यामुळे मी बोललो नाही आणि भविष्यातही बोलणार नाही. मात्र पक्षातील गद्दारांना बाहेर काढण्याची गरज आहे अन्यथा पक्ष कमकुवत होईल, असे परखड मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले.

जळगाव - मी बोललो तर संपूर्ण भारत हादरून जाईल. त्यामुळे मी बोललो नाही आणि भविष्यातही बोलणार नाही. मात्र पक्षातील गद्दारांना बाहेर काढण्याची गरज आहे अन्यथा पक्ष कमकुवत होईल, असे परखड मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले.

येथील बाबा हरदासराम सभागृहात आयोजित पक्षाच्या बैठकीत खडसे बोलत होते. ते म्हणाले, "पक्षाच्या बळकटीसाठी मी गेली अनेक वर्षे कष्ट केले आहेत. मी विरोधकांचे वार आणि तलवारही झेलली आहे. वेळोवेळी मीच पुढे झालो आहे. मी निष्कलंक असतांनाही माझ्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले. मी पुरावा मागत असतानाही आजपर्यंत पुरावा समोर आणला नाही. हा सर्व ठरवून केलेला कट आहे. परंतु मी जर बोललो तर संपूर्ण भारत हादरून जाईल त्यामुळे मी बोललो नाही, आणि भविष्यातही बोलाणार नाही. मात्र पक्षातील अशा गद्दारांना पक्षाने बाहेर काढण्याची गरज आहे अन्यथा पक्ष कमकुवत होईल.‘ असे परखड मत खडसे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलतांना खडसे म्हणाले, "पक्षातील गद्दारापासून पक्षाने सावध राहण्याची गरज आहे. मात्र पक्षात राहूनच ते पक्षाची बदनामी करीत असतील तर त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी अशा पक्षातील गद्दारांनी ओळखून त्यांच्या तोंडावर थुंकावे.‘ तसेच आज जनतेलाही माहित झाले आहे, कि नाथाभाऊवर अन्याय झाला आहे. जनता सर्व समजते आहे. जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे आपण आनंदी आहोत, असेही ते पुढे म्हणाले.

यावेळी अध्यक्षस्थानी प्रदेश निरिक्षक रविंद्र भुसारी होते. तर व्यासपीठावर खासदर ए. टी. पाटील, रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, उन्मेश पाटील, स्मिता वाघ, सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आदी उपस्थित होते.

Web Title: when I talked the country tremble - Eknath Khadse