पत्नी दारू घेण्यासाठी गेल्याने पतीने केला खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

चांगदेव (ता. मुक्ताईनगर) - महिला असूनही दारू घेण्यासाठी का गेली? या कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना आज (ता. २२) पहाटे चांगदेव शिवारात घडली.

चांगदेव (ता. मुक्ताईनगर) - महिला असूनही दारू घेण्यासाठी का गेली? या कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना आज (ता. २२) पहाटे चांगदेव शिवारात घडली.

चांगदेव (ता. मुक्‍ताईनगर) येथील रामदास सरदार बारेला कुटुंबासह कामाला आला आहे. पत्नी शांताबाई बारेला (वय २१) ही बाई असूनही दारू घेण्यासाठी बाहेर गेली याचा राग आल्याने रामदास बारेला याने पत्नीच्या डोक्‍यावर मारुन जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरदार बारेला यांनी फिर्याद दिल्याने संशयित रामदास बारेला विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक केली आहे. उपनिरीक्षक वंदना सोनुने तपास करीत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष नेवे, निरीक्षक अशोक कडलग यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: wife murder crime