आदिवासी भागातील सर्व खेडी मुख्य प्रवाहात आणणार; आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

मोखाडा - आदिवासी भागातील अतिदुर्गम खेडी मुख्य रस्त्याला जोडण्याचा ऊपक्रम युती शासनाने हाती घेतला आहे. त्यामुळे ही सर्व खेडी आता मुख्य प्रवाहात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांनी दिली आहे. ते मोखाड्यातील चास-हिंबडपाडा रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या भूमिपूजन समारंभासाठी मोखाड्यात आले होते. या पुलासाठी सुमारे एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती ही सवरा यांनी यावेळी दिली आहे..

मोखाडा तालुक्यातील चास-हिंबडपाडा या रस्त्यावर पावसाळ्यात धामणी नदीपात्रात ऊतरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे येथे प्रतिवर्षी येथे पुरात मनुष्य आणि जनावरे वाहून जीवीतहानी होण्याच्या घटना घडत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर आदिवासी विकास मंत्री तथा या विभागाचे आमदार विष्णु सवरा यांनी आदिवासी उपयोजनेतुन रस्ते व पुल मार्ग या शिर्षाखाली येथे पुल बांधण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये मंजूर केले आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ विष्णु सवरा यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी सवरा यांनी युती शासनाच्या काळात आदिवासी भागात विकास पर्व सुरू झाले असून अतिदुर्गम भागातील खेडी मुख्य रस्त्याला जोडण्याचा ऊपक्रम युती शासनाने हाती घेतल्याचे सांगितले आहे. मोखाडा तालुक्यातील खेडी जोडण्यासाठी सन  2015  मध्ये पावसाळी, हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात, रस्ते व पूल मार्ग शिर्षासाठी   38  कामांना सुमारे 10 कोटी रूपये मंजूर करण्यात आली होती. सन  2016 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन, आदिवासी विकास ऊपयोजना , ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून  173   कामांसाठी  27   कोटी रूपये मंजूर करण्यात आली आहेत. सन  2017  मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत  92   कामांना  13   कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तर सन  2018   मध्ये ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात   53   कामांसाठी सुमारे   20   कोटी रूपये केवळ रस्ते व पूल मार्ग या शिर्षासाठी मंजूर केली असल्याची माहिती विष्णु सवरा यांनी सकाळ ला दिली आहे. 

दरम्यान, युती शासनाने स्वातंत्र्यानूतर प्रथमच एव्हढा मोठा निधी उपलब्ध करून दिला असून आदिवासी भागात विकास पर्व सुरू केले आहे. यामधील अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगती पथावर आहेत. त्यामुळे आदिवासी भागात रोजगार निर्मिती देखील झाली असल्याचे सवरा यांनी सांगीतले आहे. सन  2019  पर्यंत सर्व खेडी मुख्य प्रवाहात आणण्याचा युती शासनाचा माणस असल्याचे सवरा यांनी सांगीतले आहे. 

Web Title: will connect tribal villages to main stream says minister vishnu sawra