हॉटेल हिरकणीमधून ८१ हजारांचा दारूसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

चिमठाणे - सोनगीर- दोंडाईचा रस्त्यावरील पेडकाईदेवी मंदिरासमोरील हिरकणी हॉटेलसह हातनूर (ता. शिंदखेडा) येथे काल (ता. २६) जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या भरारी पथकाने छापा टाकला. यात मध्य प्रदेशातील देशी-विदेशी दारूसह बिअर विकताना एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ८१ हजार ३६६ रुपयांचा अवैद्य दारूसाठा जप्त करण्यात आला. हॉटेल हिरकणीवर गेल्या दोन वर्षांत तब्बल सहा वेळा छापा टाकण्यात आला असून, आतापर्यंत हॉटेलमधून सुमारे दहा लाखांचा अवैद्य दारूसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. 

सोनगीर- दोंडाईचा रस्त्यावरील हिरकणी हॉटेल नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या भरारी पथकाने काल प्रजासत्ताक दिनी हिरकणी हॉटेलसह हातनूर येथील घर वजा गुदामात दुपारी तीनच्या सुमारास छापा टाकला. भरारी पथकातील उपनिरीक्षक भास्कर शिंदे, हवालदार प्रदीप  सोनवणे, हवालदार सुनील विंचूरकर, नाईक बिपीन पाटील, नाईक शिरीष भदाणे यांनी टाकलेल्या या छाप्यात किंग फिशर, टॅंगो पंच, ट्यूबर्ग, ऑफिसर चॉईस ब्लू आदी कंपन्यांचे ४९ बॉक्‍स तसेच अन्य कंपन्यांच्या देशी दारूचे बॉक्‍स असा एकूण ८१ हजार ३६६ रुपयांचा दारूसाठा आढळून आला. या प्रकरणी हवालदार सुनील विंचूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिरकणी हॉटेलचा मालक शरद ऊर्फ जॉन्टी महादू सनेर (वय ३५) याच्याविरुद्ध शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शरद सनेरला पोलिसांनी ताब्यात घेतले. उपनिरीक्षक स्वप्नील राजपूत तपास करीत आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी ‘ड्राय डे’ असताना हॉटेलसह घरात एवढा मोठा दारूसाठा सापडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

शिरपूरला ९० हजारांचा दारूसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभाग व येथील पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत  देशी- विदेशी मद्याचा अवैध साठा जप्त केला. शहरालगत वरवाडे परिसरातील घरासह जीपमध्ये हा साठा आढळला. एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अवैध मद्यविक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला. नारायण माळीच्या घरात व अंगणात उभ्या जीपमध्ये (एमएच१९/एई४०६७) देशी दारूच्या बाटल्यांनी भरलेली नऊ खोकी, बॅगपाइपर व्हिस्कीची तीन खोकी, मॅकडॉवेल्स व्हिस्कीची पाच खोकी, किंगफिशर बिअरची सात खोकी असा एकूण ८८ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Web Title: wine seized in hotel hirkani