Dhule Crime News : महिलेच्या खुनातील महिला आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Life imprisonment
Life imprisonment esakal

धुळे : शिंदखेडा बसस्थानकाच्या मागील वसाहतीत पाच वर्षांपूर्वी एका महिलेचा जाळून खून झाला होता. या प्रकरणी मुन्नीबाई सय्यद या महिलेला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एच. मोहंमद यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

त्याचबरोबर तीन हजार दंडही ठोठावला. (Woman accused in womans murder sentenced to life imprisonment dhule crime news)

शिंदखेडा बसस्थानकामागील वसाहतीत कमलबाई नावाची महिला राहते. तिच्याकडे मुन्नीबाई सय्यद व वनिता ठाकरे आल्या होत्या. या दोघांमध्ये ७ ऑगस्ट २०१८ ला रात्री साडेदहाला जेवणावरून वाद झाला. या वादातून मुन्नीबाईने वनिताच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले.

त्यामुळे वनिताचा मृत्यू झाला होता. मृत वनिताच्या मृत्युपूर्व जबाबावरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात मुन्नीबाईवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. काही दिवसांपासून खटल्याचे कामकाज सुरू होते.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Life imprisonment
Nashik Crime News: प्रॉडक्टची ऑनलाइन जाहिरातीचे आमिष पडले महाग; व्यावसायिक महिलेला 5 लाखांचा गंडा

प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एच. मोहंमद यांच्या समक्ष खटल्याचे कामकाज सुरू होते. अतिरिक्त सरकारी वकील संजय मुरक्या यांनी बाजू मांडली.

या खटल्यात दहा साक्षीदारांपैकी चार फितुर झाले. त्यानंतरही अतिरिक्त सरकारी वकील मुरक्या यांनी पुरावे सादर केले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने मुन्नीबाईला जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Life imprisonment
Dhule Crime News : काकसेवड खूनप्रकरणी सर्व संशयित कारागृहात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com