मेंढ्या घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ 

दीपक कच्छवा
रविवार, 13 मे 2018

कविताचा वेळोवेळी हेन्द्रुन (ता.धुळे) व खेडी (ता.चाळीसगाव) येथे सासरा नारायण सोनवणे, पती समाधान सोनवणे, सासु शोभाबाई सोनवणे,नंनद वायळी कोळी, नंदोई साहेबराव कोळी सर्व राहणार हेन्द्रुन( ता.धुळे) यांच्या विरूद्ध  कविताने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : माहेरहून मेढ्या घेण्यासाठी  एक लाख रुपये आणावेत, यासाठी सासरच्या मंडळीकडुन हेन्द्रुन(ता.धुळे) येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह पाच जणांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की,खेडी (ता.चाळीसगाव) येथील कविता सोनवणे या  तरुणीचा विवाह दि.4 मे 2016 ला हेन्द्रुन (ता.धुळे) येथील समाधान सोनवणे याच्याशी झाला होता.कविता हिला दिड वर्षाचा मुलगा असुन,ती आता आठ महिन्याची गर्भवती आहे.आशा परिस्थितीत समाधान सोनवणे यांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूच्या नशेत पत्नी कविताला मारहाण करू लागला.तिला जिवंत जाळुन टाकण्याची धमकी दिली.

कविताचा वेळोवेळी हेन्द्रुन (ता.धुळे) व खेडी (ता.चाळीसगाव) येथे सासरा नारायण सोनवणे, पती समाधान सोनवणे, सासु शोभाबाई सोनवणे,नंनद वायळी कोळी, नंदोई साहेबराव कोळी सर्व राहणार हेन्द्रुन( ता.धुळे) यांच्या विरूद्ध  कविताने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: women harassment in Dhule