वरसाडे येथे बिबट्याच्या हल्यात महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

नांद्रा (ता.पाचोरा ) : वरसाडे प्र.बो. येथील महिला गावालगतच्या नाल्याजवळ दुपारी एकच्या सुमारास मुलगी व दोन महिला इंधनासाठी सरपण (लाकडे )गोळा करण्यासाठी गेल्या असता. यातील मंगलबाई भुरा भिल्ल (वय३५) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला.

त्यात महिलेच्या कानशिलाखाली, खांद्यावर व पाठीवर पंज्याने हमला करुन मंगलबाई भिल्ल या महिलेस जखमी केले. सोबत असलेल्या महिला वैशाली भिल्ल  व अकरा वर्षीय मुलीने एकच कल्लोड व हातातील कु-हाडीच्या साह्याने बिबट्यास हुसकावले. यामुळे महिला बचावली आहे.

दोन महिन्यंपूर्वी दहीगाव शिवारात चौकु नं 139वर पेट्रोलींग करणाऱ्या कोमल धनराज व रामा कुमार यांना अनुक्रमे दोन वेळा या भागात रेल्वे पेट्रोलींग करतांना बिबट्या आढळून आला होता.

गिरणा नदीवर दहिगाव येथे सिंमेट बांध आहे. या बांधातील पाण्याचा वसारा हा माहेजीपर्यंत जातो. गिरणेच्या पात्राच्या भवताली मोठ्या प्रमाणात जंगल सदृश्य चिलारी काटीसह मोठमोठे नाले आहेत.

आदिवासी महिला या भागातुन इंधनासाठी सरपण जमा करतात. गेल्या सहा महिन्यापासुन दहिगाव, वरसाडे, डोकलखेडा, सामनेर या भागातील शेतांमधे शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडलेले आहे. या भागात वावरत असलेल्या बिबट्यास वेळीस बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. जखमी महिलेवर माहेजी येथील डाँ. राहुल पाटील यांच्याकडे उपचार करण्यात आले.

महिला सरपंच पती रविद्र नाईक यांनी वनपाल सुनिल भिलावे यांच्याशी संपर्क साधला असता उद्या सकाळी घटनेच्या संदर्भात आम्ही चौकशी करुण योग्य तो अहवाल वरीष्ठ पातळीवर पाठवु.
- सुनिल भिलावे, वनपाल पाचोरा.

Web Title: Women injured in Leopard attack