जळगावकरांकडून महिला कर्तृत्वाचा सन्मान!

जळगावकरांकडून महिला कर्तृत्वाचा सन्मान!

शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम

जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष- संघटनांसह शासकीय- निमशासकीय कार्यालयांत आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यक्रमांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यानिमित्ताने यथोचित सन्मान करण्यात आला. शाळा- महाविद्यालयांत विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांसह उपक्रम राबविण्यात आले.

जिल्हा न्यायालयात मार्गदर्शन
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ यांच्यातर्फे आज जिल्हा न्यायालयात महिलादिनी कार्यक्रम झाला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. लव्हेकर अध्यक्षस्थानी होते. न्यायाधीश कविता अग्रवाल, न्यायाधीश एस. एस. पाखले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा प्राधिकरणाचे सचिव आर. एम. मिश्रा, वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण वाणी आदी उपस्थित होते. डॉ. विजयश्री मुठे आणि ॲड. अनुराधा वाणी यांनी ‘पीसीपीएनडीटी कायद्या’वर मार्गदर्शन केले.

सद्‌गुरू विद्यालय
खेडी बुद्रुक येथील सद्‌गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्यामंदिरात महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका गायत्री इंगळे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी वेशभूषा, संगीत खुर्ची, ग्रिटिंग कार्ड बनविणे, मेंदी स्पर्धा यांसह पाककला स्पर्धा घेण्यात आली. गणेश लोडते, जावेद तडवी, भूषण जोशी, लीलाधर नारखेडे, सोपान पाटील, गणेश लोडले उपस्थित होते.

प्राथमिक विद्यामंदिर
युवा विकास फाउंडेशन संचलित प्रायमरी विद्यामंदिरात कार्यक्रम झाला. सुरवातीला दीपनंदा पाटील यांनी सरस्वती, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, सीताबाई भंगाळे यांच्या प्रतिमेस हार अर्पण केला. मुख्याध्यापकांच्या हस्ते शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. दिव्या लोखंडे, पल्लवी पाटील, भूमिका पाटील, इंद्रायणी निकम, पल्लवी सोनवणे यांनी क्रांतिकारी महिलांची वेशभूषा केली होती. अश्‍विनी वाघ यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे, दीपक भारंबे, दीपनंदा पाटील, स्वाती पगारे, निखिल नेहेते, सारिका सरोदे, दीपाली पाटील, उत्कर्षा सोनवणे यांनी सहकार्य केले.

जिल्हा क्षयरोग कार्यालय
जिल्हा क्षयरोग कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांना साडीवाटप करण्यात आल्या. कुष्ठरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर पाटील, डॉ. श्‍वेता गजभिये, डॉ. जयकर, डॉ. जयवंत मोरे प्रमुख पाहुणे होते. किरण निकम यांनी प्रास्ताविक केले. दीपक संदानशिव यांनी आभार मानले.

अत्रे इंग्लिश स्कूल
शिक्षणप्रसारक मंडळ संचलित (कै.) ॲड. अच्युतराव अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल व ज. प्र. कुलकर्णी प्राथमिक शाळेत मार्गदर्शन कार्यक्रम झाला. शिल्पा बेंडाळे यांनी मार्गदर्शन केले. पद्मजा अत्रे, रेवती शेंदुर्णीकर, मुख्याध्यापिका प्रीती झारे, रेखा चंद्रात्रे प्रमुख पाहुण्या होत्या. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

विद्याविकास मंदिर
विद्याविकास मंदिर प्राथमिक शाळेत कार्यक्रम झाला. नृत्य, चित्रकला, प्रश्‍नमंजूषा, कथाकथन, हस्ताक्षर, बडबडगीत, नाट्यात्मक कृती या स्पर्धा झाल्या. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कविता, गीतगायन, निबंध, काव्यलेखन, रांगोळी, मेंदी या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्याध्यापिकांसह शिक्षकांनी सहकार्य केले.

चांदसरकर प्राथमिक मंदिर
(कै.) गिरिजाबाई चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिरात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात गणेशोत्सव स्पर्धा, पाऊसगाणी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कलाशिक्षक तुषार जोशी यांना कलाप्रेमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महेश तायडे यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नील भोकरे यांनी आभार मानले.

रायसोनी इन्स्टिट्यूट
रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आज आशा फाउंडेशन व जिल्हा पोलिस दल यांच्यातर्फे ‘महिला सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी प्रा. डॉ. शमा सराफ यांनी मार्गदर्शन केले. संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस दलाचे प्रशिक्षक विनोद अहिरे यांनी महिलांना आत्मसुरक्षा कशी करावी याबाबत प्रात्यक्षिके करून दाखविली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) महिला आघाडीतर्फे कष्टकरी घरकामगार महिलांचा तालुकाध्यक्षा रमा ढिवरे व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रियंका पाटील यांच्या हस्ते साडीवाटप करून सत्कार करण्यात आला. महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करताना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश दिला. याप्रसंगी हर्षाली देवरे, मीना कोळी, लता वाघ, सुरेखा बेडसे, सुलोचना माळी आदी उपस्थित होत्या. सुनीता वाघ यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती गोसावी यांनी आभार मानले.

सोनवणे विद्यालय
मोहाडी येथील भिलाभाऊ सोनवणे विद्यालयात आज महिला दिन साजरा झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या लिला सोनवणे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शोभा सोनवणे उपस्थित होत्या. दरम्यान यावेळी स्त्री जीवनाची शिल्पकार ; सावित्री ही नाटिका सादर झाली. यासोबतच गावातून प्रभातफेरी देखील काढण्यात आली. यावेळी अलका चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर हरुण पटेल यांनी आभार मानले.

अभिनव विद्यालय
अभिनव प्राथमिक विद्यालयात कार्यक्रम झाला. यावेळी तेजश्री सोनवणे, आरती सोनवणे, नंदिनी कासार, सलोनी उन्हाळे, दिव्या टेकावडे, प्रांजली मैराळे, पूजा साळुंखे, मयूरी पाटील, धनश्री मिस्तरी आदी विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रांतील महिलांची वेशभूषा साकारली होती. उपशिक्षिका नयना मोरे व शिल्पा रावतोळे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी साधना कोल्हे, वैशाली पाटील, दीप्ती नारखेडे, प्रेमसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.

ए. टी. झांबरे विद्यालय
ए. टी. झांबरे विद्यालयात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यात कुमुद नारखेडे, पल्लवी भोगे, मोना तडवी यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी देवेश्री चौधरी व कुंतला सपकाळे यांनी मार्गदर्शन केले. मुलगी वाचवा, देश जगवा या विषयांना अनुसरून कविता सादर करण्यात आल्या. सी. बी. कोळी यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर. पाटील यांनी आभार मानले.

त्रिमूर्ती शिक्षण संस्था
त्रिमूर्ती तंत्रशिक्षण आणि औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात महिला कर्मचारी व विद्यार्थिनींचा पेन आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले. पाटील यांनी सांगितले, की त्रिमूर्ती शिक्षण संस्थेत महिला सन्मानासाठी दरवर्षी काही विद्यार्थिनींना शिक्षण, बस, पुस्तके मोफत देण्यात येतात. प्रा. दिनेश पाटील, प्रशांत गायकवाड, प्राचार्य अनुप कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आव्हाणे जि. प. शाळेत कार्यक्रम
आव्हाणे (ता. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रप्रमुख भगवान वाघे, अंजली कदम, मुख्याध्यापक मनोहर खोंडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नीता चौधरी, समिती सदस्यांसह पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्पलता राजपूत, आशा सोनवणे, वंदना चौधरी, श्‍वेतांबर पाटील, गरबड कोळी, रामदास बागूल आदींनी सहकार्य केले.

जिजामाता विद्यालय
हरिविठ्ठलनगरातील न्यू जागृती मित्रमंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात इटररॅक्‍ट क्‍लबतर्फे झालेल्या कार्यक्रमात क्‍लब प्रमुख आशा पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थिनींकडून परिसरात प्रभातफेरी काढली. यावेळी मुलींची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. रेखा महाजन, शिल्पा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे, शिक्षिका संगीता पाटील, लता इखणकर, शैलेजा चौधरी, रुकसाना तडवी आदी यावेळी उपस्थित होत्या. किशोर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय खैरनार यांनी आभार मानले.

छत्रपती शिवाजी विद्यालय
हरिविठ्ठलनगरातील न्यू जागृती मित्रमंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापिका मंगला महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. मुख्याध्यापिका महाजन, कविता पाटील यांनी महिलादिनाचे महत्त्व सांगितले. प्रशांत चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. नलिनी नेटके यांनी आभार मानले.

शासकीय तांत्रिक विद्यालयात व्याख्यान
शासकीय तांत्रिक विद्यालयात ज्योती भोळे यांचे ‘महिलांची सुरक्षितता’ या विषयावर व्याख्यान झाले. महिलांनी सार्वजनिक जीवनात काम करत असताना भारतीय संविधानाचा पूर्ण अभ्यास करून वावरले पाहिजे. प्रतिकूल स्थितीला सामोरे कसे जावे, यासाठी महिलांची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. मुख्याध्यापक डी. ए. महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी एस.बी. वाघमारे अध्यक्षस्थानी होते. डी. एल. बोंडे यांनी सूत्रसंचालन केले.

अभिनव विद्यालयात कार्यक्रम

अभिनव विद्यालयात विद्यार्थिनींना स्वरक्षणाच्या टिप्स देण्यात आल्या. प्रशिक्षक विनोद अहिरे यांनी मुलींना मार्गदर्शन केले. सविता भोळे, गिरीश कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सरोज तिवारी यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा झाली. विद्यार्थिनींनी बेटी बचाओ, स्त्री-भ्रूण हत्या यासंदर्भात जनजागृती करणाऱ्या रांगोळ्या साकारल्या. यात अपूर्वा बाविस्कर प्रथम, वृषाली चौधरी द्वितीय व मानसी जैन तृतीय आली.

युवा फाउंडेशनचे रक्तदान शिबिर
युवा फाउंडेशन व केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर झाले. शिबिरात ५० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रभारी प्राचार्य नितीन मटकरी, श्रीमती बेंडाळे, विणा भोसले, युवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक निंबाळकर, विशाल पाटील, ‘रेडक्रॉस’चे पदाधिकारी उपस्थित होते. अनघा नाफळे, रश्‍मी कांबळे, शुभांगी सपकाळे, मेघना कमलसकर, अंकिता पाटील या मुलींचा सत्कार करण्यात आला.

रेखा गॅसतर्फे ग्राहकांचा सन्मान
महिला दिनाचे औचित्य साधून रेखा गॅस एजन्सीने आज एजन्सीला भेट देणाऱ्या प्रत्येक महिला ग्राहकाचा गृहोपयोगी वस्तू भेट देऊन सत्कार केला. तसेच घरगुती गॅस वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शनही केले. यावेळी संचालक दिलीप चौबे व एजन्सीतील सहकारी उपस्थित होते.

पीसीपीएनडीटी समितीतर्फे महिला कर्मचाऱ्यांचा गौरव
महापालिका पीसीपीएनडीटी सल्लागार समितीतर्फे आज महिलादिनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात सेवाभावी महिलांचा सन्मान करण्यात आला. सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी समितीच्या सदस्य वासंती चौधरी, ॲड. मंजुळा मुंदडा, डॉ. योगेश चौधरी, डॉ. राम रावलानी, डॉ. नीलिमा भारंबे, डॉ. शिरीष ठुसे, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. पल्लवी नारखेडे, सायली पवार, डॉ. विजय घोलप, डॉ. संजय पाटील, सुभाष सनेर आदी उपस्थित होते. डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका व अन्य महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
 

राष्ट्रवादीतर्फे महिलांचा सत्कार
शहर महानगर राष्ट्रवादी महिला व युवती आघाडीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा समन्वयक विकास पवार, राष्ट्रीय सरचिटणीस कल्पनाताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मंगलाताई पाटील, शहर महानगराध्यक्षा मीनल पाटील, युवती शहराध्यक्षा डिंपल पाटील, आशा येवले, सोनाली देऊळकर, तेजस्विनी झांबरे, यांची उपस्थिती होती.

पालिकेच्या सफाई कामगार शारदा मगरे, मनकर्णा बिऱ्हाडे, उषा भालेराव, सोनी अघवाळ, प्रीती गढे, राज पिंजारी, भाजीपाला विक्रेत्या कविता मोरे, रंजना कामळे, सीमा कामळे, करिष्मा मगरे, सविता अडकमोल, रेखा गवळी, कल्पना गवळी, पूजा पाटील, पूनम विसपुते, कुसुंबा शिंदे, रेखा जगताप, विजया साबळे, अरुणा गवळी, सरस्वती नन्नवरे, छाया सावळे, प्रतिभा पाटील, सरला पाटील, जया तायडे, प्रतिभा पाटील, सरला पाटील, आदी १५० महिलांचा गुलाबपुष्प, साडी बांगड्या या सौभाग्य लेणे देवून सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com