जागतिक अश्‍व संग्रहालय सारंगखेड्याला उभारणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सारंगखेडा - सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेल्या अश्‍व बाजाराचे महत्त्व लक्षात घेता येथे जागतिक पातळीचे अश्‍व संग्रहालय करण्यात येईल. तसेच तापीचे पाणी शेतात पोचावे, यासाठी संबंधीत प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

चेतक फेस्टिव्हल अंतर्गत पर्यटन विभागातर्फे आज "उत्तर महाराष्ट्र रत्न' पुरस्काराचे वितरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, येथे घोडे व्यापाराची शेकडो वर्षांची परंपरा आहे. देशाच्या विविध भागांतून अश्‍व व्यापारी, पालक, शौकीन येतात. यावर्षी ही यात्रा पर्यटनाच्या माध्यमातून जगात पोचली आहे. त्याला अधिक चालना मिळावी, यासाठी येथे जागतिक दर्जाचे अश्‍व संग्रहालय उभारण्यात येईल. त्यात घोड्यांच्या विविध जाती, प्रजातींबाबत संशोधन करण्यात येईल. ते संशोधन जागतिक पातळीवर मान्य असेल, असे नियोजन करण्यात येईल. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, राज्य शासन यासाठी आवश्‍यक मदत करेल. तापी नदीत पाणी आहे. ते पाणी शेतात पोचावे यासाठी जामफळ, सुलवाडे प्रकल्पाला चालना दिली जाईल. तसेच अन्य उपाय करण्यात येतील, असे फडणवीस म्हणाले. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: World Horse Museum set up in sarangkheda