समाज एकतेचा नंदूरबारला एल्गार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

नंदूरबार : समाजाचा आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नतमस्तक होत.. शासनाला हक्क, सुरक्षा आणि हितरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या लाखोंच्या वज्रमुठीचा एकमुखी मूक एल्गार सोमवारी शहराने अनुभवला. पुरुषी मानसिकतेला छेद देत तरुणींच्या नेतृत्वाखाली निघालेली ही भगवी लहर शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सरकत होती. 

मोर्चात प्रारंभी युवती, महिला, युवक, नागरिक, पदाधिकारी असा क्रम होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोचला. तेथे पूर्व नियोजनानुसार सहा युवतींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान सहा युवतींनी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना निवेदन दिले. त्यानंतर मोर्चेकरी आपण समाजासाठी काही तरी चांगले करत असल्याच्या भावनेने पुढील सामाजिक कामासाठी मानसिक तयारी करत आपल्या गावाकडे परतले.

Web Title: World united to elect the Nandurbar